रत्नागिरी - राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांचे रविवारी (दि. 22 मे) झालेले भाषण हे सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) यांनी महाविकास आघाडीच्या विनंती वजा आवाहन केले आहे. ते चिपळूणमध्ये बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, ठाकरे यांच्या त्या भाषणामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. राज ठाकरे यांचे भाषण हे सर्वांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या सर्वच लोकांना मी विनंती वजा आवाहन करेन की राज ठाकरे यांनी त्यांचा रद्द झालेला दौरा याला कुणीही हवा देण्याचे काम करू नये. कोणीही चेष्टेचा विषय करू नये. तसेच राज ठाकरे यांनी जे भाषण केले ते राजकीयदृष्ट्या खूप प्रगल्भतेने आणि राजकियदृष्ट्या अतिशय वैचारीक पद्धतीने ते भाषण घेण्याची गरज आहे. राजकीय परिपक्व भाषण म्हणून त्या भाषणाकडे पाहण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.