ETV Bharat / state

सरकारमधील खेकड्यांमुळे धरण फुटले, आमदार भास्कर जाधवांची भाजप-सेनेवर टीका

मंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या सरकारमधले मंत्री हेच खरे खेकडे आहेत, असे म्हणत शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे हे बळी गेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

author img

By

Published : Jul 6, 2019, 1:11 PM IST

आमदार भास्कर जाधव

रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी केली. या दुर्घटनेत निष्पाप बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे त्यांनी यावेळी सांत्वन केले. यानंतर बोलताना जाधव यांनी खेकड्यांमुळे धरण फुटले म्हणणाऱ्या भाजप-सेनेच्या मंत्र्यांसह प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली.

मंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या सरकारमधले मंत्रीच खरे खेकडे आहेत, असे म्हणत शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे हे बळी गेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. धरण दुर्घटनेस लघु पाटबंधारे विभाग, शासकीय यंत्रणा आणि सरकार हेच जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले.

भास्कर जाधव, आमदार

तिवरेतील अजित चव्हाण या ग्रामस्थाने पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना आधीच धरण धोकादायक झाल्याचे कळवले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रांताधिकारी, चिपळूण यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये लेखी तक्रार केली होती. परंतु, त्यांनीही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले. गेल्या पाच वर्षात सरकारने कोकणातल्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी रुपायाचाही निधी दिला नाही, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

Intro:सरकारमधील खेकड्यांमुळे धरण फुटलं

शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे गेले बळी

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिवरेतील धरण दुर्घटनेत झालेल्या नुकसानीची आमदार भास्कर जाधव यांनी पाहणी केली.. यात निष्पाप बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन आणि वाचलेल्या व्यक्तींना धीर दिला. यानंतर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-सेनेचे सरकार, खेकड्यांमुळे धरण फुटले म्हणणारे त्यांचे मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली... मंत्री तानाजी सावंत आणि त्यांच्या सरकारमधले मंत्री हेच खरे खेकडे आहेत. शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे हे बळी गेल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. धरण दुर्घटनेस लघु पाटबंधारे विभाग, शासकीय यंत्रणा आणि सरकार हेच जबाबदार आहेत...तिवरेतील अजित चव्हाण या ग्रामस्थाने आधी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धरण धोकादायक झाल्याचे कळवले होते. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रांताधिकारी, चिपळूण यांच्याकडे फेब्रुवारीमध्ये लेखी तक्रार केली होती. परंतु, त्यांनीही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले...गेल्या पाच वर्षात सरकारने कोकणातल्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी रुपायचाही निधी दिला नाही. असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे...

बाईट- भास्कर जाधव, आमदारBody:सरकारमधील खेकड्यांमुळे धरण फुटलं

शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे गेले बळी Conclusion:सरकारमधील खेकड्यांमुळे धरण फुटलं

शिवसेना-भाजपमधील राजकीय साठमारीमुळे गेले बळी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.