ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान;  रा. भा. शिर्के प्रशालेची उडाली कौलं

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरीतल्या रा. भा. शिर्के प्रशालेच्या दर्शनी भागातील कौलं उडाली आहेत.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:18 PM IST

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळेही नुकसान झाले आहे. दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या दर्शनी भागातील कौले उडाली आहेत. ज्या इमारतींवर पत्रे आहेत, त्या पत्र्यांनाही तडे गेले आहेत. शाळा प्रशासनाने एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळेला सुट्टी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

चिपळूण शहराजवळच्या खेंड बावशेवाडीमध्ये वैभव श्रीपत तटकरी यांच्या घरामागे दरड कोसळली. त्यामुळे तटकरे यांच्या घराचे नुकसान झाले. मंडळ अधिकारी जाधव यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाऊस सुरू असतानाही मदतकार्य सुरू केले. दरड हटवण्यासाठी जेसीबी मशीन नेण्यात आले, मात्र थ्री फेज लाईनमुळे मशीन घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचण झाली. यामुळे मनुष्यबळाचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथेही मधुकर बबन जाधव यांचे घर पावसामुळे पडले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दापोली तालुक्यातील मौजे पंगारीतर्फे हवेली येथील गोविंदशेत परिसरातील नारायण भिकू लोंढे यांच्या घराजवळ दरड कोसळली. त्यामुळे लोंढे यांच्या घरची भिंत पडली. जवळपास 20 हजार रुपयांचे यामुळे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील शारीफ वागळे यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. तर मौजे ओणी येथील निवाते कुटुंबीयांच्या एकूण पाच घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. पडझड झालेल्या सर्व ठिकाणांचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.

Intro:मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

रत्नागिरीतल्या रा. भा. शिर्के प्रशालेची उडाली कौलं

चिपळूण, दापोलीत कोसळली दरड

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळेही नुकसान झालं आहे.

मुसळधार पावसाचा व सोसाट्याच्या वाऱ्याचा रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेलाही फटका बसला. या शाळेच्या दर्शनी भागातील इमारतीची कौले उडाली उडाली, त्यामुळे कौलांचा खच खाली पडला होता. ज्या इमारतींवर पत्रे आहेत, त्या पत्र्यांनाही तडे गेले होतो. त्यामुळे एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळेला सुट्टी देण्यात आली..

चिपळूण शहरानजीकच्या खेंड बावशेवाडीमध्ये वैभव श्रीपत तटकरी यांच्या घरामागे दरड कोसळून तटकरे यांच्या घराचे नुकसान झाले.. मंडळ अधिकारी जाधव यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि भर पावसात मदतकार्य सुरू केले... या ठिकाणी दरड हटवण्यासाठी जेसीबी मशीन नेण्यात आले, मात्र थ्री फेज लाईनमुळे मशीन घटनास्थळापर्यंत नेण्यास अडचण झाली.. यामुळे कामगारच मदतकार्य करत आहेत.

दरम्यान मंडणगड तालुक्यातील दुधेरे येथेही मधुकर बबन जाधव यांचे घर पावसामुळे पडल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तर दापोली तालुक्यातील मौजे पंगारीतर्फे हवेली येथील गोविंदशेत परिसरातील नारायण भिकू लोंढे यांच्या घराजवळ दरड कोसळली.. ही दरड कोसळल्याने लोंढे यांच्या घरची भिंत कोसळली. त्यामुळे जवळपास 20 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. तर मौजे ओणी येथील निवाते कुटुंबियांच्या एकूण पाच घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या सगळ्या नुकसान ग्रस्त घटनांचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील शारीफ वागळे यांच्या घराचं अंशतः 7 हजार 200 रुपयांचं नुकसान झालं आहे..
Byte - गायत्री गुळवणी, मुख्याध्यापिका, शिर्के हायस्कूल

Body:मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

रत्नागिरीतल्या रा. भा. शिर्के प्रशालेची उडाली कौलं

चिपळूण, दापोलीत कोसळली दरडConclusion:मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान

रत्नागिरीतल्या रा. भा. शिर्के प्रशालेची उडाली कौलं

चिपळूण, दापोलीत कोसळली दरड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.