ETV Bharat / state

मंत्री उदय सामंतांची जिल्हा रुग्णालयाला भेट; अधिकाऱ्यांची केली कानउघडणी

भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रमीण रुग्णालयातील फायर ऑडिटचा आढावा घ्यायला हवा होता. परंतु, असे काही झाले नसल्याचे मंत्री उदय सामंतांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली व सर्व कामे पूर्ण करण्यासाठी १४ जानेवारीपर्यंतची मुदत दिली.

Uday Samant
उदय सामंत
author img

By

Published : Jan 11, 2021, 7:37 AM IST

रत्नागिरी - भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात घडलेल्या घटनेनंतर काल(रविवारी) उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत रत्नागिरीतील नवजात शिशू बालकांच्या विभागाची त्यांनी पाहणी केली. नवजात शिशू विभाग आणि प्रसुती विभागाचे फायर ऑडिट झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.तर जिल्हा रुग्णालयाचे तब्बल ३० वर्ष स्ट्रक्टरल ऑडिटच झाले नसल्याचेही समोर आले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील उणिवा जाणून घेत त्यांनी अधिकाऱ्यांना यावर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. चार दिवसात फायर ऑडिटसह स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही तर घरी पाठवेन, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

उदय सामंतांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली

फायर ऑडिटची घेतली माहिती -

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागून १० बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला. यानंतर राज्यातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्व रुग्णालयांनी तत्काळ फायर ऑडिट काढण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देवून तेथील फायर ऑडिटची माहिती घेतली. परंतु जिल्हा रुग्णालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी यावेळी उपस्थित राहिले नाहीत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना धरले धारेवर -

जिल्हा रुग्णालयात आगमन होताच सामंतांनी प्रसुतीगृहाला भेट दिली. तेथे अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध नव्हती. तर, कोरोनाचा प्रदुर्भाव असूनही वॉर्ड रुग्णांसह नातेवाईकांनी भरगच्च झाला होता. सामंत यांनी निवासी वैद्यकिय अधिकार चंद्रकांत शेरखाने यांना यामुळे धारेवर धरले. रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले आहे का? याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासारख्या इमारती आपल्याकडे आहेत? या प्रश्नावरही अधिकारी शांत उभे राहिल्याने सामंत संतप्त झाले. 'दुर्घटना होत आहेत, छोटे-छोटे विषय गांभीर्याने घ्या, फायर ऑडिट करा', हे सांगण्यासाठी मंत्र्यांनीच यायला हवे का? मग तुम्ही काय करता, अशा शब्दात सामंतांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

भंडारा जिल्हा रुग्णालयात झाली होती मोठी दुर्घटना -

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली होती. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.