ETV Bharat / state

Uday Samant On Sanjay Raut : शरद पवारांनी सांगितलेल्या गोष्टींवर आत्मचिंतन करा, उदय सामंत यांचा संजय राऊतांना टोला - उदय सामंत पत्रकार परिषद

मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. शरद पवारांनी सांगितलेल्या गोष्टींवर राऊतांनी स्वत: आत्मचिंतन करायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.

Uday Samant
उदय सामंत
author img

By

Published : May 10, 2023, 10:36 PM IST

उदय सामंत

रत्नागिरी : महाविकास आघाडीची मोट ज्यांनी बांधली त्या शरद पवारांनीच 'सामना'वर आणि रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्यांवर ज्या शेलक्या शब्दांत काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं आत्मचिंतन त्यांनी केले पाहिजे, असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

'संजय राऊत आता शरद पवारांना सल्ले देत आहेत' : मंत्री उदय सामंत म्हणाले की, रोजच्याप्रमाणे सकाळी एक पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते, त्यावरही काहीतरी बोलण्यात आलं. 'सामना'तून शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेबाबतही काही गोष्टी सांगण्यात आल्या, आणि त्यावर सारवासारवही करण्यात आली. तसेच संजय राऊत आजपर्यंत आम्हाला सल्ला देत होते, आता शरद पवारांना द्यायला लागले आहेत, असेही सामंत म्हणाले.

'मुख्यमंत्र्यांचा कर्नाटकातील प्रचार खुपला' : उदय सामंत पुढे म्हणाले की, शरद पवार आपला राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरले असे 'सामना'तून सांगण्यात आले. यावर शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचे आहे. आम्ही पूर्वीपासून जे सांगत होतो की यांची दखल घ्यायची आवश्यकता नाही, तेच आज शरद पवारांनी सांगितलं. 'सामना' आम्हीही वाचत नाही आणि आम्ही त्याची दखलही घेत नाही. दरम्यान कर्नाटक सारख्या राज्यात प्रचाराला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जो प्रतिसाद मिळाला तो अनेकांच्या डोळ्यांत खुपला, त्यामुळे ते दुःख साडेनऊ वाजता व्यक्त झालं, असे म्हणत मंत्री सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

'शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसूत प्रकल्प होईल' : शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू प्रकल्प पुढे नेला जाईल असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, रिफायनरीच्या दृष्टीने बारसूमध्ये सुरू असलेलं माती परीक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे. येत्या तीन-चार दिवसात माती परिक्षणासाठी बोर मारून पूर्ण होतील. त्यानंतर मातीची चाचणी होईल. चाचणीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकल्पाचा निकाल लागेल. हा प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे, कुठे होणार आहे, हे कंपनीवाले सांगतील. दरम्यान तिथल्या लोकांवर पोलिसी दबाव आणून कुठेही काम करण्याची कोणाचीही इच्छा नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काही लोकांनी करू नये असं देखील मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

'कातळशिल्प विकसित केली जातील' : कातळशिल्पांबाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, बारसूच्या कातळशिल्पांबाबत फार मोठा गैरसमज आहे. कातळशिल्प यामध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही. कातळशिल्प हे एमआयडीसी अधिग्रहित करणार नाही. कातळशिल्प हे शेतकऱ्यांकडेच राहतील. त्यानंतर सरकार किंवा कंपनीच्या माध्यमातून ही कातळशिल्प विकसित केली जातील. ते पर्यटन स्थळ बनवलं जाईल आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून जे उत्पन्न येईल ते देखील त्या शेतकऱ्यांना दिलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : जाणून घ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची संपूर्ण टाइमलाइन
  2. Maharashtra Political Crisis : 'या' आमदारांवर आहे, कारवाईची टांगती तलवार
  3. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.