...केंद्र सरकारची हीच तर खासियत, उदय सामंत यांची टीका - उदय सामंतची राज्य सरकारवर टीका बातमी
राज्य सरकार एखादे काम चांगले करत असेल, तरी ते किती वाईट पद्धतीने करत आहेत अशी बोंबाबोंब करणे ही केंद्र सरकारची खासियत असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
रत्नागिरी - राज्य सरकार एखादे काम चांगले करत असेल, तरी ते किती वाईट पद्धतीने करत आहेत अशी बोंबाबोंब करणे ही केंद्र सरकारची खासियत असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने पूर्ण माहिती केंद्र सरकारला दिली असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
कॅगने जलयुक्त शिवारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. त्याच संदर्भातही चौकशी लागली आहे. या योजनेच्या संस्थापकाला टार्गेट करायचं म्हणून ही चौकशी लागली नसल्याचा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. कुणी कुणाचे तोंड दाबत नाही, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात कुणाला बोंबाबोंब करायची असेल तर खुशाल करू देत, असे खुले आव्हान जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
हेही वाचा - पन्हाळे धरणातून पाण्याची गळती, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण