रत्नागिरी - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सारखे केंद्राकडे बोट न दाखवता, तसेच केंद्राने हे केले नाही ते केले नाही म्हणण्यापेक्षा राज्याने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात जास्त जे लसीचे डोस देण्यात आले, महाराष्ट्र आज लसीकरणात एक नंबर आहे असे सांगतात, मग ही लस आली कोठून केंद्रानेच दिली ना, केंद्र मुद्दाम अन्याय करते असे नाही, असे म्हणत आठवले यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.
'महाविकास आघाडी सरकारने सारखे केंद्राकडे बोट दाखवू नये'
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सारखे केंद्राकडे बोट न दाखवता, तसेच केंद्राने हे केले नाही ते केले नाही म्हणण्यापेक्षा राज्याने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे.