ETV Bharat / state

पोसरे येथील मृतांच्या वारसांना मदत; मंत्री परब यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप - Posare landslide accident help

जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते आज मदत व अन्नधान्य वाटप करण्यात आले.

Posare landslide accident help
पोसरे दरड दुर्घटना
author img

By

Published : Jul 28, 2021, 10:25 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. यात 17 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते आज मदत व अन्नधान्य वाटप करण्यात आले. शासन खंबीरपणे या सर्वांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन परब यांनी केले.

पोसरे येथील नुकासानीचे दृश्य

हेही वाचा - रत्नागिरी जिल्हा बँक पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 5 टक्के दराने कर्ज देणार - मंत्री उदय सामंत

मृतांच्या वारसांना शासनातर्फे प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश आज पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात आज मृतांच्या वारसांना हे धनादेश देण्यात आले. तसेच, खेड तालुक्यातील बीरमणी येथे मृत्यू पावलेल्या दोन मृत व्यक्तींच्या वारसांना धनादेश वितरीत करण्यात आला.

नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे काळाची गरज - परब

पालकमंत्री परब म्हणाले, दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे, ही काळाची गरज बनली आहे. यासाठी अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही आवश्यक आहे. दरड प्रवण क्षेत्रातील वस्त्यांची यादी तयार करावी आणि नागरिकांची म्हाडाच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्था होण्याबाबतची योजना तयार करण्यात येईल. पालकमंत्री म्हणून ही जबाबदारी मी स्वीकारतो.

हेही वाचा - पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नागरिकांना तातडीने मदत द्यावी - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.