ETV Bharat / state

Anil Parab on ST Issue : एसटी विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या हातात नाही - परिवहन अनिल परब

author img

By

Published : Jan 26, 2022, 1:34 PM IST

एसटी विलिनीकरणाचा ( ST Merge Issue ) मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे त्या समितीच्या व्यतिरिक्त कुणी हस्तक्षेप करू शकत नाही, असे परिवहनमंत्री अनिल परब ( Minister Anil Parab ) म्हणाले.

anil parab
अनिल परब

रत्नागिरी - एसटी विलिनीकरणावर ( ST Merge Issue ) समिती अभ्यास करून निर्णय देणार आहे, त्यामुळे तो मुद्दा आमच्या हातात नाही, असे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब ( Transport Minister Anil Parab ) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. ( Minister Anil Parab Intracted with media on Repuplic day 2022 Ratnagiri )

माध्यमांशी बोलताना मंत्री अनिल परब

लोकांना वेठीस धरणे योग्य नाही -

एसटी नुकसानात असतानाही जवळपास ४१ टक्यांची भरीव पगारवाढ कामागारांना दिली आहे. कामगारांशी सतत संपर्क करून देखील काही कामगार विलिनिकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपत नाही आहे. शासन आपल्या परीने संप मिटावा म्हणुन प्रयत्न करत आहे. मात्र, विलिनिकरणाचा मुद्दा उच्च न्यायलयाच्या खंडपीठाने एका समितीसमोर ठेवला आहे. समिती त्यावर अभ्यास करून निर्णय़ देणार आहे. म्हणून तो मुद्दा आमच्या हातात नाही. हे वारंवार आम्ही कर्मचाऱ्यांना समजावून सांगत आहोत. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. लोकांना वेठीला धरणं योग्य नाही. लोकांच्या चुकीच्या पद्धतीने वेठीला धरलं जात आहे, असे मंत्री परब यावेेळी म्हणाले.

राज्यपाल हस्तक्षेप करू शकत नाहीत -

दरम्यान, एसटी विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोर आहे. त्यामुळे त्या समितीच्या व्यतिरिक्त कुणी हस्तक्षेप करू शकत नाही. कारण न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ते काम सुरू आहे. त्यामुळेे राज्यपाल त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असेही मंत्री परब यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा - Sanjay Raut on Opposition : 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राज्यात उत्साह, तर मुख्यमंत्र्यावर टीका करणारे नामर्द'

नगरपंचायत निवडणुकीबाबत बोलताना मंत्री परब म्हणाले, यावेळचा निकाल हा मागच्या वेळेपेक्षा नक्कीच चांगला होता. केवळ नगरपंचायतीच्या निकालांवर यश अपयश मोजले जात नाही. शिवसेना पक्ष हा विधानसभेचे जे काही संख्याबळ आहे त्याच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे, असंही परब यावेळी म्हणाले.

सोमय्या यांना आता पंतप्रधानाच्या खुर्चीत बसायचे आहे -

नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून काही कागदपत्र चाळत असतानाचा भाजप नेते किरीट सोमैयांचा फोटो व्हायरल झाला. यानंतर या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारने सोमैयांना नोटीस पाठवली. याप्रकरणी परब यांनी सोमैयांना चिमटा काढला. सोमैयांना आता पंतप्रधानाच्या खुर्चीत बसायचे आहे, असा टोला त्यांनी लगावला.

पाच वर्ष करा आणि निवडणुकीची वाट पहा -

महाविकास आघाडीला सव्वादोन वर्ष झाली. भाजप प्रत्येक गोष्टीला विरोध करत आहे. या प्रश्नावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला चिमटे काढलेत. भाजप प्रत्येक गोष्टीत विरोध करते आहे. १०५ असून ते खुर्चीच्या बाहेर रहिलेत. त्यामुळे पाच वर्ष पूर्ण करा आणि निवडणुकीची वाट पाहा, असा टोला परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपला लगावला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.