ETV Bharat / state

मातृभूमी कंपनीचा लोकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा, संचालकांविरोधात गुन्हा दाखल - अठरा टक्के

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर कंपनीचे संचालक प्रदिप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातृभूमी कंपनीचा लोकांना करोडो रुपयांचा गंडा, संचालकांविरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Jun 25, 2019, 4:37 PM IST

रत्नागिरी - तब्बल 18 टक्के व्याजदराने गुंतवणुकदारांना परताव्याचे आमिष दाखवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप भोवती कायद्याचा फास आवळण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना मातृभूमी कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या नॉन बँकीग कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकात करोडोंच्या ठेवी गोळा करत गुंतवणुकदारांना चुना लावला आहे. ठेवीच्या रक्कमेची परतफेड होत नसल्याने अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील गुंतवणुकदारांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. करोडोंची माया गोळा करणाऱ्या कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातृभूमी कंपनीचा लोकांना करोडो रुपयांचा गंडा, संचालकांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनंतर कंपनीचे संचालक प्रदिप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मातृभूमी कंपनीकडून फसवणूक झाल्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 404 गुंतवणुकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारदारांची 2 कोटी 33 लाख 97 हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या चौघांपैकी हेमंत बिश्वास आणि विनोदभाई पटेल या दोघांना गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे. उर्वरित दोघेजण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत.

गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर तब्बल 18 टक्के व्याजदर, गुंतवणुक करणाऱ्या एजंटलाही 5 टक्के रक्कम, कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये 100 रुपये दरमहा गुंतवणुक केली अनं अपघाती मृत्यू झाल्यास ८० हजार रुपये, अशा आकर्षक नॉन बँकिंग कंपनीच्या जाहिरातीला राज्यातील अनेक फसले आहेत. मातृभूमी ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हे आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे मोठे कार्यालय थाटण्यात आले होते. २००९ मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्यावेळी रत्नागिरीसह राज्यातील 15 जिल्ह्यात मातृभूमी कंपनीच्या माध्यमातून या कंपनीने आपले पाय रोवले. कंपनीने पहिले काही वर्षे ठरलेल्या आकर्षक दराने ठेवीदारांना पैसे परत दिले. मात्र, नंतर हळूहळू कंपनीने मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या नावाखाली विविध 10 कंपन्या स्थापन केल्या.

10 कंपन्यांची नावे -

  1. मातृभूमी ईन लिमिटेड
  2. मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड
  3. मातृभूमी एक्झॉटिक हॉस्पीटीलीटी
  4. मातृभूमी डेअरी
  5. मातृभूमी फार्म अ‍ॅण्ड रिसोर्टस
  6. मातृभूमी टुर्स अ‍ॅण्ड हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड
  7. मातृभूमी इन्शुरन्स सर्व्हिसेस
  8. मातृभूमी पब्लिकेशन
  9. मातृभूमी फाऊंडेशन
  10. मातृभूमी फॅब्रिकेशन्स

मातृभूमी कंपनीने महाराष्ट्रात बोरिवली, चिपळूण, डहाणू, बोयसर, हिंगोली, कोल्हापूर, कुडाळ, लातूर, मंडणगड, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, रायगड, सांगली या ठिकणी आपली झोनल ऑफिस सुरु केली होती.

Intro:
रत्नागिरीतील चौदाशे गुंतवणुकदारांना करोडोंचा चुना

मातृभूमी कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल

दोघांना गुजरातमध्ये अटक

रत्नागिरी, प्रतिनिधी

अँकर- तब्बल अठरा टक्के व्याजदराने गुंतवणुकदारांना परताव्याचे आमिष दाखवून करोडोंचा गंडा घालणाऱ्या मातृभूमी ग्रुप भोवती कायद्याचा फास घट्ट आवळण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील गुंतवणुकदारांना या कंपनीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. या नॉन बँकिंग कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकात करोडोंच्या ठेवी गोळा करत गुंतवणुकदारांना चुना लावला आहे. ठेवीच्या रक्कमेची परतफेड होत नसल्यानं अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील गुंतवणुकदारांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. करोडोंची माया गोळा करणाऱ्या कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिओ-१- गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर तब्बल अठरा टक्के व्याजदर, गुंतवणुक करणाऱ्या एजंटला हि पाच टक्के रक्कम, कंपनीच्या मेडिक्लेम पाॅलिसीमध्ये शंभर रुपये दरमहा गुंतवणुक केल्यास अपघाती मृत्यू झाल्यास ८० हजार रुपये अशा आकर्षक नाँन बँकिंग कंंपनीच्या जाहिरातीला राज्यातील अनेक जण फसले असतील.मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या माध्यमातून हेच आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण इथं मोठं कार्यालय थाटण्यात आले.२००९ मध्ये हे कार्यालय थाटण्यात आलं. रत्नागिरीसह राज्यातील पंधरा जिल्ह्यात मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या माध्यमातून या कंपनीने आपले पाय रोवले. मात्र नाँन बॅकिंग असलेल्या या कंपनीच्या आकर्षक जाहिरातीवर अनेक जण भुळले आणि फसले. कंपनीने पहिले काही वर्ष ठरलेल्या आकर्षक दराने ठेवीदारांना पैसे परत दिले. हळूहळू कंपनीने मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या नावाखाली विविध दहा कंपन्या स्थापन केल्या. गुंतवणुकदार आकर्षित होण्यासाठी कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या बोगस कंपन्या कंपनीने काढल्या ते पाहूया...

ग्राफ इन

कंपन्याची नावे-- मातृभूमी ईन लिमिटेड, मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड, मातृभुमी एक्झाॅटिक हाॅस्पीटीलीटी, मातृभुमी डेअरी, मातृभुमी फार्म अँण्ड रिसोर्टस, मातृभुमी टुर्स अँण्ड हाॅलिडेज प्रायव्हेट लिमिटेड, मातृभुमी इन्शुरन्स सर्व्हिसेस, मातृभूमी पब्लिकेशन, मातृभुमी फाऊंडेशन आणि मातृभुमी फॅब्रिकेशन्स

महाराष्ट्रात थाटलेली दुकाने--- बोरिवली, चिपळूण, डहाणू,बोयसर, हिंगोली,कोल्हापूर,कुडाळ, लातूर,मंडणगड, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, रायगड, सांगली आणि पेण इथं झोनल आँफिस

ग्राफ आऊट

व्हिओ-२- मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीचा थाट पाहून अनेक गुंतवणुकदारांनी यात गुंतवणुक केल्या. करोडो रुपयांच्या ठेवी या मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवल्या गेल्या. कंपनीने महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटकात देखिल आपले पाय रोवून इथंल्या गुंतवणुकदारांकडून याच योजनांखाली कोट्यावधीची माया गोळा केली. त्यापैकी एक अरविंद मोरे. आपल्या घरातील मंडळीसोबत चेन तयार करुन तब्बल सात लाख रुपये अरविंद मोरे यांनी गुंतवले.कंपनीकडून गुंतवलेल्या रक्कमेची पावती सर्व रितसर दिली गेली. मात्र रक्कम परत देण्याची वेळ आली त्यावेळी मात्र कंपनीने हातवर केले. गेली दिड वर्ष कंपनीच्या पायऱ्या झिजवल्यानंतर फसवणुक झाल्याची खात्री झालेल्या अरविंद यांनी चिपळूण पोलिस स्थानकात या संदर्भातील तक्रार दिली.

बाईट-१- अरविंद मोरे. तक्रारदार

व्हिओ-३- मातृभूमी कंपनीविरोधात अरविंद मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कंपनीचे संचालक प्रदिप गर्ग, संजय हेमंत बिश्वास, मिलिंद अनंत जाधव आणि विनोदभाई पटेल या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मातृभूमी कंपनीकडून फसवणुक झाल्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ४०४ गुंतवणुकदारांनी तक्रारी केल्यात. या तक्रारदारांची २ कोटी ३३ लाख ९७ हजारांची फसवणुक झाल्याचे समोर आलंय.गुन्हा दाखल असलेल्या चौघा संचालकांपैकी हेमंत बिश्वास आणि विनोदभाई पटेल हे दोघेजण गुजरातमधील सुरत इथं न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित दोघेजण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलीयेत. त्यामुळे फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी चिपळूण पोलिस स्थानकात संपर्क साधण्याचे आव्हान रत्नागिरीच्या जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केलंय.

बाईट-२- डाॅ. प्रविण मुंढे, पोलिस अधिक्षक, रत्नागिरी

व्हिओ-४-मातृभूमी ग्रुप आँफ कंपनीचा भांडाफोड पहिल्यांदा गुजरात पोलिसांनी केला. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात या कंपनीचा डोलारा फार मोठा आहे. त्यामुळे आता रत्नागिरी पोलिस अटक असलेल्या दोन संचालकांना महाराष्ट्रात घेवून येण्यासाठी न्यायलायीन प्रक्रिया लढतायत. त्यामुळे नाॅन बॅकिंग कंपनीत कमी वेळेते अधिक पैसे गुंतवणूक करताना काळजी घेणं आवश्यक आहे..
Body:रत्नागिरीतील चौदाशे गुंतवणुकदारांना करोडोंचा चुना

मातृभूमी कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल

दोघांना गुजरातमध्ये अटकConclusion:रत्नागिरीतील चौदाशे गुंतवणुकदारांना करोडोंचा चुना

मातृभूमी कंपनीच्या चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल

दोघांना गुजरातमध्ये अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.