ETV Bharat / state

Midterm Election : महाराष्ट्रात येत्या 6 महिन्यांत मध्यावधी निवडणुका लागतील - खासदार विनायक राऊत

author img

By

Published : Nov 15, 2022, 9:12 PM IST

महाराष्ट्रात येत्या 6 महिन्यांत विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका (Maharashtra will hold midterm assembly elections) लागतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी म्हटले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. Latest news from Ratnagari

Midterm Assembly Elections
खासदार विनायक राऊत

रत्नागिरी : महाराष्ट्रात येत्या 6 महिन्यांत विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका (Maharashtra will hold midterm assembly elections) लागतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी म्हटले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर बोलताना विनायक राऊत

राज्याला मध्यावधी निवडणुकीचे वेध- यावेळी विनायक राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या केसला किती जरी विलंब लागला तरी कायदेतज्ज्ञांच्या मते जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत त्या केसचा निकाल लावावाच लागेल. निकाल काय लागेल हे स्पष्ट आहे. ते झाल्यानंतर कदाचित राष्ट्रपती राजवट लावतील आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

मविआ नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न - तसेच खोट्यानाट्या केसेस टाकून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. रडीचा डाव खेळणारे हे सरकार आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी यावेळी केली. दरम्यान आमची सर्वोच्च न्यायालयात लढण्याची तयारी भक्कम आहे. कितीही विलंब लागला तरी न्याय आमच्या बाजूनेच होईल असेही राऊत यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.