ETV Bharat / state

तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटींचा निधी मंजूर; जलसंधारण विभागाची घोषणा

तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील हे धरण 2 जुलै 2019 ला फुटले होते. या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता.

tiware dam reconstruction
तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटींचा निधी मंजूर; जलसंधारण विभागाची घोषणा
author img

By

Published : Jan 24, 2020, 7:22 PM IST

Updated : Jan 24, 2020, 11:05 PM IST

रत्नागिरी - तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील हे धरण 2 जुलै 2019 ला फुटले होते. या दुर्घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच धरण नव्याने उभे करण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे.

तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटींचा निधी मंजूर; जलसंधारण विभागाची घोषणा

यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी प्राथमिक टप्प्यात मंजूर झाला आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. सध्या येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी कोयना प्रकल्पांतर्गत अलोरे व नागावे येथे असलेल्या 15 हेक्टर शासकीय जमिनीची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा - पनवेलचा घरजावई निघाला बांगलादेशी, इनामुल मुल्लाचा 'असा' झाला मनोहर पवार

जलसंधारण विभागाकडून संबंधित निधी मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी धरण दुरुस्तीसाठी मागणी जलसंधारण विभागाकडे केली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पुढील दीड वर्षात धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Intro:
तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी, प्रतिनिधी

तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिपळूण तालूक्यातील तिवरे धरण हे 2 जुलै 2019 रोजी फुटले या धरण दुर्घटनेत एकूण 23 जणांचा बळी गेला होता. धरण दुर्घटना होऊन 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच धरण नव्याने उभारणीची तयारी शासनाने सुरु केली असून त्यासाठी 9 कोटी रुपयांची प्राथमिक टप्प्यात मंजूर देखील करण्यात आला आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. तूर्तास येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी कोयना प्रकल्पांतर्गत अलोरे व नागावे येथे असलेल्या 15 हेक्टर शासकीय जमिनीची निवड करण्यात आली आहे. जलसंधारण विभागाकडून हा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी धरण दुरुस्तीसाठी मागणी जलसंधारण विभागाकडे केली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे व पुढच्या दीड वर्षात धरण दुरुस्ती केली जाणार आहे.
Body:
तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Conclusion:
तिवरे धरणाच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर
Last Updated : Jan 24, 2020, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.