ETV Bharat / state

85 टक्के नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात 79 हजार 145 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यातही भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे यंदा हे पीक धोक्यात आले आहे. अनेक शेतकाऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. तर काही शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी
author img

By

Published : Nov 4, 2019, 6:09 PM IST

Updated : Nov 5, 2019, 8:44 AM IST

रत्नागिरी - अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू असून 85 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी

रत्नागिरी जिल्ह्यात 79 हजार 145 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यातही भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे यंदा हे पीक धोक्यात आले आहे. अनेक शेतकाऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. तर काही शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. कापलेले पीक काही ठिकाणी शेतातच कुजले. या पावसामुळे जिल्ह्यात 5 हजार 994 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण 33 हजार 642 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पैकी 85 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा - बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नका - आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना धीर

5 हजार 70 हेक्टर वरील बाधित क्षेत्रातील 28 हजार 533 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. काढणी पश्चात पिकांचे किती नुकसान आणि उभ्या पिकांचे किती नुकसान झाले आहे, हे प्रामुख्याने पंचनामे करताना पाहण्यात आले आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - 'आंदोलनासाठी वैध मार्ग वापरा, रास्तारोको केल्यास दाखल होणार गुन्हा'

  • तालुकानिहाय नुकसान बाधित क्षेत्र -
  1. मंडणगड - 138.5 हेक्टर बाधित क्षेत्र, 107.2 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  2. दापोली - 325 हेक्टर बाधित क्षेत्र, 259.9 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  3. खेड - 920 हेक्टर बाधित क्षेत्र, 743.47 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  4. चिपळूण - 640.57 हेक्टर बाधित क्षेत्र, 640.55 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  5. गुहागर - 462.39 हेक्टर बाधित क्षेत्र, 453.9 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  6. संगमेश्वर - 703.93 हेक्टर बाधित क्षेत्र, 603.93 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  7. रत्नागिरी - 1250 हेक्टर बाधित क्षेत्र, 782.14 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  8. लांजा - 704 हेक्टर बाधित क्षेत्र, 656.98 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण
  9. राजापूर - 850 हेक्टर बाधित क्षेत्र, 822.86 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Intro:

85 टक्के नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरी, प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचं नुकसान झालं आहे. सध्या या नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्याचं काम वेगाने सुरू असून 85 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात 79145 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यातही भात हे जिल्ह्यातील मुख्य पीक.. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा हे पीक धोक्यात आलं आहे. अनेक शेतकाऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. तर काही शेतकऱ्यांचं 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालं आहे. कापलेलं पीक काही ठिकाणी शेतातच कुजलं. या पावसामुळे जिल्ह्यात 5994 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. एकूण 33642 शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पैकी 85 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. 5070 हेक्टर वरील बाधित क्षेत्रातील 28533 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. काढणी पश्चात पिकांचं किती नुकसान आणि उभ्या पिकांचं किती नुकसान झालं आहे, हे प्रामुख्याने पंचनामे करताना पाहण्यात आलं आहे.

तालुकानिहाय नुकसान बाधित क्षेत्र

1) मंडणगड - 138.5 हेक्टर बाधित क्षेत्र, 107.2 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

2) दापोली - 325 हेक्टर बाधित क्षेत्र, 259.9 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

3) खेड - 920 हेक्टर बाधित क्षेत्र, 743.47
हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

4) चिपळूण - 640.57 हेक्टर बाधित क्षेत्र, 640.55 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

5) गुहागर - 462.39 हेक्टर बाधित क्षेत्र, 453.9 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

6) संगमेश्वर - 703.93 हेक्टर बाधित क्षेत्र, 603.93 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

7) रत्नागिरी - 1250 हेक्टर बाधित क्षेत्र, 782.14 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

8) लांजा - 704 हेक्टर बाधित क्षेत्र, 656.98 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

9) राजापूर - 850 हेक्टर बाधित क्षेत्र, 822.86 हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Byte _--- सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारीBody:
85 टक्के नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Conclusion:
85 टक्के नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Last Updated : Nov 5, 2019, 8:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.