ETV Bharat / state

आगामी निवडणुका नव्या ओबीसी अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात - खासदार सुनील तटकरे

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तीव्रतेने मांडला गेला होता. त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

Sunil Tatkare latest news
Sunil Tatkare latest news
author img

By

Published : Sep 24, 2021, 1:16 PM IST

रत्नागिरी - गेले काही दिवस ओबीसी अध्यादेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या अध्यादेशावर मोहर उमटविली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. ते चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पक्षाच्या कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते.

प्रतिक्रिया

'निवडणुका नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात' -

यावेळी तटकरे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात तीव्रतेने मांडला गेला होता. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात, त्याचबरोबर आता ज्या काही जिल्हा परिषदांच्या निवडणूका घोषित झाल्या आहेत, त्या निवडणुकादेखील राज्य आयोगाला विनंती करून त्या जर का निवडणुका थांबविता आल्या आणि नवीन अध्यादेशामध्ये ओबीसी आरक्षणाबाबत ज्या काही तरतुदी आहेत, त्यानुसार जर का त्या घेता आल्या, तर तेही योग्य होईल, असे आपले मत असल्याचे खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले. राज्यसभेच्या पोटनिवडणूकीबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची पोटनिवडणूक लागली आहे. यापूर्वी अशा पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी जर का काँग्रेस प्रयत्न करत असेल, तर ते योग्य आहे, असे आपले मत असल्याचे खासदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

गीतेंचे वक्तव्य अतिशय निंदनीय -

शिवसेना नेते अनंत गीते यांनी आमच्या सर्वांचे दैवत असलेल्या शरद पवारांबाबत जे वक्तव्य केले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीबाबत जे वक्तव्य केले, ते अतिशय निंदनीय असून त्याबाबतीत त्यांचे खूप राजकीय अज्ञान असल्याची टीका तटकरे यांनी यावेळी केली. महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करत आहे, अशावेळी गीतेंचे वक्तव्य म्हणजे एक चुकीचा पायंडा असल्याचे तटकरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - राज्यात दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार? - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.