रत्नागिरी - पावसमधील खांबड परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला आहे. मंगळवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास या परिसरात ग्रामस्थांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसला. ही खबर परिसरात पसरताच अनेकांनी या बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भुकेमुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.