ETV Bharat / state

'अजून खाती वाटून शकले नाही, हे सरकार जनतेला न्याय काय देणार ?' - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रत्नागिरीत सरकारवर जोरदार टीका केली.

प्रविण दरेकर
प्रविण दरेकर
author img

By

Published : Dec 26, 2019, 4:45 PM IST

Updated : Dec 26, 2019, 11:18 PM IST

रत्नागिरी - मुख्यमंत्र्यांचे या सरकारवर नियंत्रण नाही. यांच्या विसंवादातच हे सर्व अडकले आहेत. त्यामुळे फार काळ ही लोक एकत्रित राहणार नाहीत. अजून नीट खातीही वाटू शकलेले नाहीत, हे काय जनतेला न्याय देणार, हे सरकार विसंवादाने भरलेले असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी ते आज रत्नागिरीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार आसूड ओढले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, या सरकारमधील लोकांना राज्यातील जनतेला काय हवे आहे, याचा विचार करण्यासाठी वेळ नाही. एवढी ही मंडळी सत्तेमध्ये मश्गूल झाली आहेत. सत्तेसाठी आपापल्या भूमिकेला तिलांजली देण्यात आली आहे. सरकार आले तेव्हापासून स्थगितीचे दणादण निर्णय झाले. केवळ राजकीय द्वेषापलीकडे हे सरकार काहीच करत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळविण्यात आलेली नाहीत, पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातच ही खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळविण्यात आली आहेत.

हे सरकार केवळ सूडबुद्धीने वागत असून अमृता फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली. अमृता फडणवीस ट्विटर प्रकरणावरून मनसेने सल्ले देण्यापेक्षा पक्षाची जी अधोगती होत आहे. त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे

कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने दिलेली कर्जमाफीबाबत शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफी केली म्हणजे नेमके काय केले, सरकारने जे आश्वासन दिले होते त्याच काय झाले. केवळ शेतकऱ्यांना काहीतरी दिले पाहिजे म्हणून कर्जमाफीची घोषणा. कर्जमाफी म्हणजे टाईमपास करण्याचे काम असल्याची टीका यावेळी दरेकर यांनी केली.

हेही वाचा - ...तर ती जबाबदारी आनंदाने स्वीकारेन - उदय सामंत
नागरिकत्व दुरुस्ती विधयेकाला होत असलेल्या मुद्द्याबाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, ज्यांना मुस्लिमांच्या मतांवर राजकारण करायचे आहे. ते भाजप सरकार विषयी मुस्लीम समाजात द्वेष पसरविण्याचे काम करून आपली व्होट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा - शिवसेनेच्या 10 रुपयातल्या थाळीची निलेश राणेंकडून खिल्ली

Intro:विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर चौफेर टीका

हे सरकार विसंवादातच अडकलं आहे - दरेकर

मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल या सरकारवर नाही - दरेकर

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल या सरकारवर नाही
यांच्या विसंवादातच हे सर्व अडकले आहेत. त्यामुळे फार काळ ही लोकं एकत्रित राहणार नाहीत. अजून नीट खातीही वाटू शकलेले नाहीत, काय हे जनतेला न्याय देणार, हे सरकार विसंवादाने भरलेलं हे सरकार असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणूकिच्या प्रचारासाठी ते आज रत्नागिरीत आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार आसूड ओढले..
यावेळी बोलताना ते म्हणाले की, या सरकारमध्ये प्रत्येकाला आपल्यासाठी हवंय, राज्यातल्या जनतेला काय हवंय याचा विचार करण्यासाठी वेळ नाही एवढी सत्तेमध्ये ही मंडळी मश्गूल झाली आहेत. सत्तेसाठी आपापल्या भूमिकेला तिलांजली देण्यात आली आहे.
सरकार आलं तेव्हापासून स्थगितीचे दणादण निर्णय झाले.केवळ राजकीय द्वेषापलीकडे हे सरकार काही करत नाही.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अक्सिस बँकेत वळविण्यात आलेली नाहीत, पूर्वीच्या आघाडी सरकारच्या काळातच ही खाती अक्सिस बँकेत वळविण्यात आली आहेत. मात्र हे सरकार केवळ सूडबुद्धीने वागत असून अमृता फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम सध्या या सरकारकडून सुरू असल्याची टीका दरेकर यांनी यावेळी केली.
अमृता फडणवीस ट्विटर प्रकर्णावरूनन मनसेने सल्ले देण्यापेक्षा पक्षाची जी अधोगती होतेय त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरकारने दिलेली कर्जमाफीबाबत शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कर्जमाफी केली म्हणजे नेमकं काय केलं, सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्याच काय झालं.
केवळ शेतकऱ्यांना काहीतरी दिल पाहिजे म्हणून कर्जमाफीची घोषणा. कर्जमाफी म्हणजे टाईमपास करण्याचं काम असल्याची टीका यावेळी दरेकर यांनी केली..
नागरिकत्व दुरुस्ती विधयेकाला होत असलेल्या मुद्द्याबाबाबत बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की ज्यांना मुस्लिमांच्या मतांवर राजकारण करायचं आहे ते भाजप सरकार विषयी मुस्लीम समाजात विद्वेष पसरविण्याचं काम करून आपली व्होट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.. या सर्व विषयांबाबत प्रवीण दरेकर यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनीBody:विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर चौफेर टीका

हे सरकार विसंवादातच अडकलं आहे - दरेकर

मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल या सरकारवर नाही - दरेकर

Conclusion:विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सरकारवर चौफेर टीका

हे सरकार विसंवादातच अडकलं आहे - दरेकर

मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल या सरकारवर नाही - दरेकर

Last Updated : Dec 26, 2019, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.