रत्नागिरी - जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाने मजूर महिलेसह तिच्या पतीला शुक्रवारी रात्री बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. त्यामुळे याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत उर्फ बाबा चव्हाण, असे या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाचे नाव आहे. तो लोवले गावचा सरपंच असून गावात त्याची दहशत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी या उपतालुकाप्रमुखाची मुजोरी पाहायला मिळाली. त्याने त्याच दिवशी गावातील एका मजूर महिलेसह तिच्या पतीला बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ देखील केली. त्यानंतर महिलेने पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरोधात तक्रार दिली. त्याच दिवशी चव्हाण याला अटक करण्यात आली. दरम्यान, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
संगमेश्वरमध्ये शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाची मुजोरी, मजूर महिलेसह पतीला मारहाण - रत्नागिरी लेटेस्ट न्यूज
चंद्रकांत उर्फ बाबा चव्हाण, असे या शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखाचे नाव आहे. तो लोवले गावचा सरपंच असून गावात त्याची दहशत असल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी या उपतालुकाप्रमुखाची मुजोरी पाहायला मिळाली.