ETV Bharat / state

तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे - Passengers present railway station for 1 hour

प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेआधी किमान एक तास स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशांची रेल्वेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.

konkan railway
कोकण रेल्वे
author img

By

Published : Sep 25, 2020, 10:34 PM IST

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी या दोन गाड्या धावणार असल्याची घोषणा झाली आहे. पण, या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेच्या किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशांची रेल्वेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.

कोकण रेल्वेच्या मार्गावर 26 सप्टेंबरपासून तुतारी, तर 2 ऑक्टोबरपासून राजधानी या दोन गाड्या धावणार आहेत. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रवाशांचे तापमान तपासून मगच रेल्वेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या निर्धारित तापमानापेक्षा अधिक तापमान आढळल्यास त्या व्यक्तीला ट्रेनने प्रवास करता येणार नाही. प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्रवाशांनी किमान एक तास आधी रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. त्याचबरोबर स्थानक परिसरात वावरताना प्रवाशांची परस्परात सुरक्षित अंतर ठेवून वावरायचे आहे. आयत्या वेळी येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सूचना महत्वाची आहे.

तपासणी पूर्ण झाल्यावरच प्रवाशांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून ही सगळी पाऊले कोकण रेल्वेकडून उचलली जात आहेत. यामुळे तुम्ही जर कोकण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या निर्धारित वेळेच्या आधी किमान एक तास रेल्वे स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.