ETV Bharat / state

Kokan Rain News : कोकणात पूरग्रस्त परिस्थिती; रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

author img

By

Published : Jul 19, 2023, 11:56 AM IST

Updated : Jul 19, 2023, 12:18 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. वशिष्ठी नदी व शिव नदी दुथडी भरुन वाहत आहेत. पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Kokan Rain Update
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रत्नागिरी : कोकणातील चिपळूण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीच्या पाण्याने धोकापातळी गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याने येत्या चार दिवसात राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्या, मदतकार्य आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी आमदार शेखर निकम हे देखील उपस्थित होते.

नदीच्या पाणी पातळीत वाढ : राज्यात पावासाचा जोर गेल्या दोन दिवसांपासून वाढला आहे. हवामान खात्याने येत्या चार दिवसात कोकणासह राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वशिष्ठीचे पाणी धोकापातळीपर्यंत वाढले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच पूरामुळे बाधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वशिष्ठी नदीतील गाळ : दोन वर्षापूर्वी वशिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्यावेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता. वशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहिती सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Heavy Rainfall in Kolhapur: धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली
  2. Monsoon rain Update : विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस
  3. Heavy Rain Alert : उत्तराखंड, उत्तर प्रदेशात अति मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या भागाला आहे मुसळधार पावसाचा धोका

Last Updated : Jul 19, 2023, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.