रत्नागिरी कोकणात महत्त्वाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्या गणेशोत्सवाला Ganeshotsav देवरूखच्या चौसोपी वाड्यातून Chausopi Wada प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील प्रसिद्ध आणि 350 वर्षापेक्षा देखील जास्त वर्षे परंपरा Kokan Devrukh The Tradition Of 375 Years असलेल्या पंतभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील बाप्पाचं आज आगमन झाले. मोरगावच्या गणेशोत्सवाप्रमाणे Ganeshotsav of Morgaon येथील गणोशोत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस अगोदर म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेला या गणेशोत्सवाची सुरुवात होते. देवरुखमधल्या जोशी यांना मोरगाव येथे दृष्टांत मिळाल्यापासून या गणपतीची स्थापना करण्यात येते. मोरगावच्या प्रथेपरंपरेनुसार हा उत्सव साजरा करण्यात येतो. प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
उत्सवासाठीची गणेशमूर्ती देवरूख येथील भोंदे कुटुंबीय घडवित असतात. वाजत गाजत मूर्ती आणल्यानंतर या गणपतीची विधिवत पूजाअर्चा Ganesh Chaturthi Puja करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते. मोरगावच्या उत्सवाप्रमाणे या ठिकाणी गणेशोत्सवाचा हा उत्साह साजरा केला जातो. साडे तीनशे वर्षाहून अधिक काळाची पंरपरा लाभलेला देवरुखच्या चौसोपी वाड्यातील हा गणेशोत्सव कोकणातील परंपरा Ganeshotsav tradition in Konkan आणि संस्कृती आजही जपतोय.