ETV Bharat / state

नार्वेकरांचा बंगला पाडला, अनिल परबांचे रिसाॅर्ट केव्हा पाडणार - भाजप नेते किरीट सोमैया

author img

By

Published : Aug 23, 2021, 7:09 PM IST

Updated : Sep 10, 2021, 1:50 PM IST

मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला आता अनिल परबांचे रिसाॅर्ट केव्हा पाडणार, असा सवाल भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

रत्नागिरी - मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला आता अनिल परबांचे रिसाॅर्ट केव्हा पाडणार, असा सवाल भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सोमैया यांनी या तोडलेल्या बंगल्याची सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) मुरुड येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.

बोलताना किरीट सोमैया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे दापोली तालुक्यातील मुरुड गावातील अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होते. भाजप नेते किरीट सोमैया यांनी याबाबत प्रशासन तसेच केंद्राकडेही तक्रार केली होती. त्यानंतर सोमैया यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणी येऊन आठवडाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर आंदोलन करण्याचा प्रशसनाला इशारा दिला होता. दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांनी हा बंगला तोडण्याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमैया यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली. जवळपास पंधरा मिनिटे मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाहेर होते.

प्रशासनाला नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता

प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता. म्हणून प्रशासनाने मिलिंद नार्वेकर यांना स्वतः बंगला पाडलायला सांगितले, असा दावा यावेळी किरीट सोमैया यांनी यावेळी केला आहे.

...तर खटला दाखल करावा

दरम्यान, आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या बंगल्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही सोमैया यांनी समाचार घेतला. वैभव नाईक व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांना हरित लवादा किंवा कोणत्याही न्यायालयात खटला दाखल करावा, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

आता मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टचा नंबर

मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची पहाणी केल्यानंतर किरीट सोमैया यांनी साई रिसॉर्टची पाहणी केली. हे रिसॉर्ट मंत्री अनिल परब यांचे अनधिकृत रिसाॅर्ट असून मिलिंद नार्वेकर यांचा बंगला गेला. आता मंत्री अनिल परब यांच्या रिसाॅर्टचा नंबर असल्याचे सोमैया यावेळी म्हणाले. सोमैया म्हणाले, अनिल परब यांनी 18 हजार स्केअरफुटचा अनधिकृत रिसाॅर्ट बांधला. 5 कोटी 41 लाख या रिसाॅर्टला खर्च केला आहे. त्यासाठीचा पैसा कुठून आला त्याची चौकशी आता आयकर विभागाने सुरू केली असल्याचेही यावेळी किरीट सोमैया म्हणाले.

हेही वाचा - ...अखेर मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच पाडले 'त्या' बंगल्याचे बांधकाम

Last Updated : Sep 10, 2021, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.