ETV Bharat / state

सुप्रसिद्ध चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत, 4 जूनपासून प्रदर्शन सुरू

श्री. मुळ्ये यांनी सुरवातीला टेंभ्ये हायस्कूलमध्ये 14 वर्षे आणि नंतर रा. गो. जागुष्टे  हायस्कूलमध्ये 15 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात विद्यार्थ्यांना चित्रकलेचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी छंदवर्ग, लँडस्केपसाठी वर्गदेखील आयोजित केले.

author img

By

Published : Jun 3, 2019, 11:27 AM IST

सुप्रसिद्ध चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत

रत्नागिरी - येथील सुप्रसिद्ध चित्रकार व निवृत्त चित्रकला शिक्षक रवींद्र विनायक मुळ्ये यांची 'वाईब्स ऑफ नेचर' या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण 28 चित्रे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झळकणार आहेत. 4 जून ते 10 जून 2019 या कालावधीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनाची त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. यासाठी त्यांनी 2011 ला अर्ज केला होता. 2 बाय 2 फूटापासून 4 बाय 3 फूटापर्यंतची चित्रे जहांगीरमध्ये पाहायला मिळणार आहेत. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक रंगामध्ये साकारलेली ही चित्रे सर्वांनाच भुरळ घालणारी आहेत. मनातील स्पंदनांचे सृजन असलेली ही चित्रे पाहण्यासारखी आहेत.

श्री. मुळ्ये यांनी सुरवातीला टेंभ्ये हायस्कूलमध्ये 14 वर्षे आणि नंतर रा. गो. जागुष्टे हायस्कूलमध्ये 15 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात विद्यार्थ्यांना चित्रकलेचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी छंदवर्ग, लँडस्केपसाठी वर्गदेखील आयोजित केले. 2014 ला शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेसाठी वाहून घेतले आहे. पोर्ट्रेट, लँडस्केपमध्येही त्यांचा विशेष हातखंडा आहे. जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाने त्यांच्या चित्रकारकिर्दीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Intro:चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत

4 जूनपासून प्रदर्शन सुरू

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी येथील प्रख्यात चित्रकार व निवृत्त चित्रकला शिक्षक रवींद्र विनायक मुळ्ये यांची वाईब्स ऑफ नेचर या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण 28 चित्रे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झळकणार आहेत. 4 जून ते 10 जून 2019 या कालावधीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे. कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक कलरमध्ये साकारलेली ही चित्रे सर्वांनाच भुरळ घालणारी आहेत. मनातील स्पंदनांचे सृजन असलेली ही चित्रे पाहण्यासारखी आहेत.
श्री. मुळ्ये यांनी सुरवातीला टेंभ्ये हायस्कूलमध्ये 14 वर्षे आणि नंतर रा. गो. जागुष्टे हायस्कूलमध्ये 15 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून सेवा बजावली. नोकरीच्या काळात विद्यार्थ्यांना चित्रकलेचे योग्य मार्गदर्शन देण्यासाठी छंदवर्ग, लँडस्केपसाठी वर्ग आयोजित केले. पोर्ट्रेट, लँडस्केपमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. 2014 ला शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रकलेसाठी वाहून घेतले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनाची त्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. यासाठी त्यांनी 2011 ला अर्ज केला होता. 2 बाय 2 फूटापासून 4 बाय 3 फूटापर्यंतची चित्रे जहांगीरमध्ये पाहायला मिळणार आहेत. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून जीडी आर्ट व एटीडीचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी नोकरी मिळाली. या शिक्षकी नोकरीबरोबर मुळ्ये यांनी स्वतःमधील चित्रकार जागता ठेवला.
जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनाने त्यांच्या चित्रकारकिर्दीवर आणखी एक तुरा खोवला जाणार आहे.

Body:चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत

4 जूनपासून प्रदर्शन सुरू
Conclusion:चित्रकार रवींद्र मुळ्ये यांची चित्रे झळकणार जहांगीर आर्ट गॅलरीत

4 जूनपासून प्रदर्शन सुरू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.