रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या ठिकठिकाणी दिपावलीचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचंही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लांजा शहरात १४ हजारांवर पणत्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची प्रतिमा साकारत अनोखा दिपोत्सव साजरा करण्यात आला.
लांजा शहरातील फ्रेंडस् ग्रुप लांजाच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपातील दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमात लांजा न्यु इंग्लिश स्कुलच्या पटांगणावर १४ हजार ४४४ पणत्या लावण्यात आल्या. तसेच या पणत्यांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली. फ्रेंडस् ग्रुपच्या माध्यामातून अशा पद्धतीने दिपोत्सव साजरे करण्याचे हे १४ वे वर्ष आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या दिपोत्सव आयोजनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हेही वाचा - दिवाळी खरेदीवर पावसाचे सावट, विक्रेत्यांना फटका
हेही वाचा - 'क्यार' वादळाचा धोका टळला; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती