रत्नागिरी- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी गावात दोन दिवसांत तब्बल ५९ जणांना विंचू दंश झाला आहे. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने या तिघांना रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा- 'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'
भाताच्या पेंढ्या सुखवण्यासाठी कातळावर पसरुन ठेवण्यात येतात. अधिक काळ एका जागेवर या पेंढ्या राहिल्याने त्याखाली मोठ्या प्रमाणात विंचू येवून बसतात. या पेंढ्या उचलताना शेतकऱ्यांना विंचू दंश झाला. येथील ५९ शेतकऱ्यांना विंचूने दंश केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.