रत्नागिरी - राणे साहेब जिथे गेले आहेत, तिथे यशस्वी होवोत हीच आमची इच्छा असल्याची कोपरखळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी लगावली आहे. राजापूर येथील काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांच्या प्रचारासाठी दलवाई आले होते.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढलेल्या नारायण राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. माजी खासदार निलेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपत प्रवेश केला.
हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीनं महाराष्ट्राचं नुकसान झालं - मोदी
राणे साहेब आमचे आदरणीय नेते होते, काँग्रेसमध्ये त्यांना आदर मिळत होता. पण आता ते भाजपमध्ये गेले आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. मात्र, राणे साहेबांनी जी लांब उडी मारलेली आहे, माझ्या मते त्यांनी चूक केली, असे दलवाई म्हणाले.