रत्नागिरी - कोकणातील मोठा सण समजल्या जाणाऱ्या शिमगोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फाकपंचमीला फाका सुरू झाल्या असून जिल्हाभरात गावागावात शिमगोत्सवाची लगबग सुरू आहे. मात्र यंदा शिमगोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे होळी उभी करणे होय. फाक पंचमीला गावागावात होळ्या उभ्या करण्यात येतात. प्रत्येक गावचा शिमगोत्सव साजरा करण्याच्या प्रथा परंपरेत थोडीफार तफावत दिसून येते. या शिमगोत्सवाला फाक पंचमीला प्रारंभ झाला आहे. कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.