ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार पाऊस; चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी, मठ येथील प्रसिद्ध दत्त मंदिरही पाण्याखाली - चांदेराई बाजारपेठ रत्नागिरी बातमी

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे. मुसळधार पावसाने नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे रत्नागिरीतल्या चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी जमा झाले आहे. काल सकाळपासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. 24 तास उलटूनही बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

रत्नागिरी मुसळधार पाऊस
रत्नागिरी मुसळधार पाऊस
author img

By

Published : Aug 5, 2020, 9:38 PM IST

मठ
मठ येथील प्रसिद्ध श्री स्वयंभू दत्त मंदिर मंगळवारपासून पाण्याखाली

रत्नागिरी : जिल्ह्याला मुसळधार पावसाने चांगलच झोडपून काढलं आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे रत्नागिरीतल्या चांदेराई बाजारपेठेत पाणीच पाणी जमा झाले आहे. काल सकाळपासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. 24 तास उलटूनही बाजारपेठेतील पाणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे मंगळवारी सकाळी चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी वाढत होती. मग पाणी जैसे थे होते. ओहोटीच्या वेळेस रात्री 1 वाजल्यानंतर पाणी थोडे कमी झाले. परंतु, आज पहाटे पुन्हा अचानक पाण्याचा वेग वाढला. कालच्या पाण्याच्या पातळीपेक्षा आजच्या पाण्याची पातळी अधिक असून पाणी खूप वेगात वाढत असल्याने चांदेराई हरचिरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मठ येथील श्री स्वयंभू दत्त मंदिर पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातल्या मठ येथील प्रसिद्ध श्री स्वयंभू दत्त मंदिर मंगळवारपासून पाण्याखाली गेले आहे. काजळी नदीला आलेल्या पावसामुळे पुराचे पाणी मंदिरात घुसले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.