रत्नागिरी - जिल्ह्यातील हातीस गावाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. नदीच्या पाणी पातळीत रविवारी रात्री वाढ झाल्याने पुराचे पाणी हातीस येथील पीर बाबरशेख दर्ग्यात शिरले होते. यामुळे अनेकांची धावपळ उडाली.
मुसळधार पावसात ग्रामीण भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सलग सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर स्थिती निर्माण झाली आहे.