ETV Bharat / state

Mumbai Goa Expressway Toll Start : मुंबई-गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका सुरू, वाचा, काय आहेत टोलचे दर - toll booth on Mumbai Goa highway starts

मुंबई-गोवा महामार्गावरील पहिला टोल बुथ आज सुरू झाला. राजापूर येथील हातवाले टोलनाक्यावर आजपासुन नागरिकांना टोल भरावा लागणार आहे . सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून, एनएचएआयने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. हातीवले ते कणकवली या ७० किमी अंतरासाठी हा टोल अकारण्यात येत आहे.

Hathiwale Toll Start
Hathiwale Toll Start
author img

By

Published : Apr 11, 2023, 9:52 PM IST

आजपासुन नागरिकांना टोल भरावा लागणार

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका आजपासून सुरु झाला आहे. राजापूर येथील हातीवले टोल नाका आजपासून सुरु झाला आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे. हातीवले ते कणकवली पर्यतच्या ७० किलोमिटरमधील अंतरासाठी हा टोल असणार आहे. ७० किलोमिटर पैकी ६९ किलोमिटरच्या चौपदरीकरणाचं काम पुर्ण झालं आहे. त्यापैकी ५५ किलोमिटरसाठी हा टोल असणार आहे. स्थानिकांसाठी ७० टक्केपर्यत सुट असणार आहे. महिन्याला ३३० रुपये भरून हा पास मासिकपास म्हणून स्थानिकांना वापता येणार आहे.

टोल वसुली सुरू : टोलबाबत बोलताना टोल वसुली कंत्राटदार यशवंत मांजरेकर म्हणाले की, यापूर्वी हा टोल सुरू झाला होता, मात्र स्थानिकांचा विरोध, पसरलेले गैरसमज यामुळे हा टोलनाका बंद झाला होता. पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जेव्हा रत्नागिरी दौरा झाला. तेव्हा गडकरी साहेबांनी सर्वांना क्लीअर केले की, जो रूट पूर्ण झाला आहे, त्याची आपण टोलवसुली करू शकतो. तसे आदेश एनएचएआयकडून आम्हाला प्राप्त झाले.

टोल वसुली सुट देण्याचे प्रयत्न : त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मागच्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एक मिटिंगदेखील घेतली, त्यामध्ये एनएचएआयच्या अधिकाऱ्यांबरोबर पालकमंत्र्यांची सविस्तर चर्चा झाली. दरम्यान यातून सूट देता येईल का याबाबत पालकमंत्र्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि पालकमंत्री हे गडकरी साहेबांकडून करून आणतील याची आपणाला खात्री असल्याचं मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या टोलसाठी माफी देता येत नाही, पण पालकमंत्री, राणे साहेब हे सर्व यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील मांजरेकर यावेळी म्हणाले. तसेच सध्या हा टोल सुरळीत चालेल अशी आपणाला खात्री असल्याचं देखील मांजरेकर यांनी यावेळी सांगितलं.

वाहनाचा प्रकार वनवे जर्नी - रिटर्न जर्नी : कार - 90 - 130, ट्रक, बस - 295 - 445, 3 एक्सल - 325 - 485, एलसीवी / एलजिवी - 140 - 210, ओव्हर साईझ एक्सल - 565 - 850

हेही वाचा - Mahavikas Aghadi : काँग्रेसला महाविकास आघाडीत दुय्यम स्थान?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.