ETV Bharat / state

हसन मुश्रीफ यांची शेवगाव-पाथर्डी तालुक्याला भेट, शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भाळगाव, बोधेगाव आदी परिसरात पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. केंद्र सरकार जीएसटीचे ३० हजार कोटी देत नाही, याचा पाढा वाचत ठाकरे सरकार वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ
author img

By

Published : Oct 22, 2020, 5:37 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील दक्षिण भागातील शेवगाव-पाथर्डी तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या आणि मदतीच्या अपेक्षेत असलेल्या बळीराजाला तुमची दिवाळी गोड करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून पंचनामे झालेले नाहीत, जमिनीच वाहून गेल्यात, आता कसले पंचनामे करणार, अन्न गोड लागेना अशा विविध तक्रारी केल्या.

माहिती देताना पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी हा दुष्काळी पट्टा आहे. जायकवाडीच्या बॅक वॉटरवर कसेबसे कपाशीचे पीक या भागात उभे केले जाते. मुळात ऊसतोडणी कामगार असलेला या भागातील शेतकरी यावर्षी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आधीच बॅक वाटरमुळे अनेकांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. असे असताना अतिवृष्टीमुळे ज्या भागात कापशीचे पीक होते, ते पण पाण्यात गेले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भाळगाव, बोधेगाव आदी परिसरात पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. केंद्र सरकार जीएसटीचे ३० हजार कोटी देत नाही याचा पाढा वाचत ठाकरे सरकार वेळप्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले. यावेळी ८० टक्के पंचनामे झाले असा दावा त्यांनी केला. दरम्यान, अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या बळीराजाने, साहेब सगळे वाहून गेले, अन्न गोड लागत नाही, अशी कैफियत मांडली. त्यावर पालकमंत्र्यांनी शासन जास्तीतजास्त मदत करेल, तुमची दिवाळी गोड जाईल, असे आश्वासन देत काढता पाय घेतला.

हेही वाचा- कोरोनाचा मंगल कार्यालयांना फटका; समारंभात ५०० नागरिकांना उपस्थित राहू देण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.