ETV Bharat / state

पुरामध्ये 9 तास एसटीची रोकड टपावर सांभाळून ठेवणाऱ्या अधिकाऱ्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार - चिपळूण आगार व्यवस्थापक

पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते राजेशिर्के यांचा गौरव करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
author img

By

Published : Jul 29, 2021, 7:42 PM IST

रत्नागिरी - पुराच्या वेळी एस.टी महामंडळाची रोख रक्कम तब्बल नऊ तास एसटीच्या टपावर बसून सुखरुप सांभाळणाऱ्या आगार व्यवस्थापकाच्या धाडसाचे व प्रामाणिकपणाचे कौतूक पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी केले. तसेच आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांचा राज्याचे परिवहन मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मला अभिमान असल्याचे प्रतिपादन अनिल परब यांनी चिपळूण येथे केले. पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते राजेशिर्के यांचा गौरव करण्यात आला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

हे कर्मचारी एस.टी. महामंडळाचे वैभव -

संकटाच्या वेळी प्रत्येक माणूस प्रथम आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो. परंतु यावेळी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देवून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी यावेळी आभार मानले. हे कर्मचारी एस.टी. महामंडळाचे वैभव आहेत. सार्वजनिक मालमत्ता वाचविण्याचे काम एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केले. या कामगिरीमुळे एसटी महामंडळाचा नावलौकिक आज देशभरात पोहोचला आहे. त्यामुळे या विभागाचा मंत्री म्हणून मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भविष्यात पुन्हा एसटी महामंडळाचा उत्कर्ष होईल, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.