रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील वसंत लाया चौगले या गोविंदाचा Death of Govinda Vasant Chaugule शुक्रवारी दहीहंडीच्या दिवशी नाचताना मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील हर्णै पाजपंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या Dahi Handi Celebrated in Harnai Pajpandhari Village उत्साहात साजरा केला जातो. सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
गोविंदाचा नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह जोरात होता. यामध्ये वसंत चौगुले सहभागी झाले होते. पण, नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
पंचक्रोशीतील दहीहंडी उत्सवावर शोककळा वसंत चौगले पाजपंढरी गावातील होमाआळी मंडळातील कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीतील गोविंदांवर दुःखाचे सावट पसरले. दापोली परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. तालुक्यातील हर्णै पाजपंढरी गावात कोळी समाजातर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हेही वाचा Dahi Handi Festival मुंबईत दहीहंडीदरम्यान ११६ गोविंदा जखमी, माजी महापौरांची रुग्णालयात धाव