ETV Bharat / state

ग्रामीण जीवनाच्या देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'; नाचणे येथील सुपल कुटुंबीयांचा उपक्रम

author img

By

Published : Sep 7, 2019, 11:45 PM IST

नाचणे येथील सुपल कुटुंबीय वेगवेगळ्या देखाव्यातून गेल्या 21 वर्षापासून गेणेशोत्सवात सामाजित संदेश देत आहेत. यावर्षी त्यांना 'महाराष्ट्राची लोकधारा' हा देखावा साकारला आहे.

सुपल कुटुंबीय

रत्नागिरी - गेली 21 वर्ष रत्नागिरीतल्या नाचणे येथील चंद्रकांत सूपल आणि त्यांचे कुटुंब गणेशोत्सवातील देखाव्यातून सामाजिक संदेश देत आहेत. यावर्षीही त्यांनी जवळपास चार देखावे बनवले आहेत. त्यातील 'महाराष्ट्राची लोकधारा'या चलचित्र देखाव्यातून ग्रामीण जीवन दाखवण्यात आले आहे.

ग्रामीण जीवनाच्या देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'

'महाराष्ट्राची लोकधारा' या देखाव्यामध्ये अगदी पहाटे वासुदेवाच्या स्वारीपासून ते घरात जात्यावर दळण दळणारी स्त्री, त्यानंतर शेतात राबणारा बळीराजा, बैलजोडी अशा नाना तऱ्हांनी नटलेल्या या देखाव्यातून संपूर्ण ग्रामीण जीवन उभे करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या एका चलचित्र देखाव्यातून झाडे तोडू नका हा संदेश देण्यात आला आहे. या देखाव्यातून झाडाची आर्त विनवणी दाखवण्यात आली आहे. लाकूडतोड्या झाड तोडत असताना झाडाला अश्रू अनावर होत असून मला तोडू नकोस, अशी आर्त विनवणी झाड करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे तिसऱ्या एका देखाव्यात झाडामध्ये गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. मी दगडात नाही तर झाडातच असल्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. तसेच चौथ्या देखाव्यात सुतळ आणि काथ्यापासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. टाकाऊ वस्तूंपासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. अशा या विविध पर्यावरणपूरक देखाव्यांमधून सुपल कुटुंबीयांनी एक सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Intro:पर्यावरणपूरक देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'

रत्नागिरी, प्रतिनिधी

गेली 21 वर्ष रत्नागिरीतल्या नाचणे येथील चंद्रकांत सुपल आणि त्यांचं कुटुंब गणेशोत्सवातील देखाव्यातून सामजिक भान जपण्याचं करत आहे. दरवर्षी ते गणेशोत्सवातील देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचं काम करत आहेत. यावर्षीही त्यांनी जवळपास चार देखावे बनवले आहेत. त्यातील 'महाराष्ट्राची लोकधारा'या चलचित्र देखाव्यातून ग्रामीण जीवन दाखवण्यात आलं आहे.  अगदी पहाटे वासुदेवाच्या स्वारीपासून ते घरात जात्यावर दळण दळणारी स्त्री त्यानंतर शेतात राबणारा बळीराजा, बैल जोडी आशा नाना तऱ्हांनी नटलेल्या या देखाव्यातून संपूर्ण ग्रामीण जीवन उभं करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या एका चलचित्र देखाव्यातून झाडं तोडू नका हा संदेश देण्यात आला आहे. या देखाव्यातून झाडाची आर्त विनवणी दाखवण्यात आली आहे. लाकूडतोड्या झाड तोडत असताना झाडाला अश्रू अनावर होत असून मला तोडू नकोस अशी आर्त विनवणी झाड करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर तिसऱ्या एका देखाव्यात झाडामध्ये गणेशाची मूर्ती साकारण्यात आली असून मी दगडात नाही तर झाडातच असल्याचं संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. तर चौथ्या देखाव्यात सुतळ आणि काथ्यापासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून ही मूर्ती साकारण्यात आली आहे.. आशा या विविध पर्यावरणपूरक देखाव्यांमधून सुपल कुटुंबियांनी एक सामजिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचाच आढावा घेत सुपल कुटुंबाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

Body:पर्यावरणपूरक देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'
Conclusion:पर्यावरणपूरक देखाव्यातून सादर केली 'महाराष्ट्राची लोकधारा'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.