रत्नागिरी- दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे शिकारीला गेलेल्या विनोद बैकर या युवकाचा गावठी बनावटीच्या बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तपासास सुरुवात केली असता, त्यांना अवैध गावठी बंदुकांचे घबाडच सापडले आहे. या प्रकरणातील सुत्रधारानेच मृत विनोद बैकर याला गावठी बनावटीची बंदूक दिली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी 8 बंदुकांसह 14 संशयितांना दापोली पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.
8 गावठी बंदुकांसह 14 संशयितांना अटक, दापोली पोलिसांची कारवाई - ratnagiri hunting case
दापोली शहराजवळील शिवाजीनगर भोंजाळी येथील संशयित अमित मधुकर रहाटे हा या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे कळले. त्याच्या घरावर दापोली पोलिसांनी छापा मारला असता त्याने आपण पेंडूर( ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग) याच्या कडून दोन वर्षांपूर्वी 16 बंदुका खरेदी केल्याचे पोलिसांना सांगितले.