ETV Bharat / state

गुहागरमध्ये मच्छिमार बोट बुडाली, सुदैवाने जीवितहानी नाही - fishing boat sank in Guhagar news

बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून बोटीवरील खलाशी हे धोपावे गावातले रहिवासी असल्याचे समजत आहे. दरम्यान अचानक बोट बुडाल्याने यातील 6 खलाशी पोहत किनारपट्टीवर आले, तर उर्वरित दोघे काही काळ बुडणाऱ्या बोटीचा सहारा घेत राहिले. हे आठही प्रवाशी सुखरूप असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

सुदैवाने जीवितहानी नाही
सुदैवाने जीवितहानी नाही
author img

By

Published : Aug 9, 2020, 4:17 PM IST

रत्नागिरी : जिल्ह्यातल्या गुहागरमधील अंजनवेलच्या लाईट हाऊसच्या समोर खोल समुद्रात मच्छिमारी बोट बुडल्याची घटना आज (रविवार) सकाळी घडली. या बोटीत एकूण 8 खलाशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे आठही प्रवाशी सुखरूप असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

आज सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून बोटीवरील खलाशी हे धोपावे गावातले रहिवासी असल्याचे समजत आहे. दरम्यान अचानक बोट बुडाल्याने यातील 6 खलाशी पोहत किनारपट्टीवर आले, तर उर्वरित दोघे काही काळ बुडणाऱ्या बोटीचा सहारा घेत राहिले. सुदैवाने आजूबाजूला ठराविक अंतरावर दुसरी एक बोट असल्यामुळे बुडणाऱ्या बोटीवरील इतर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मच्छिमारांच्या या बोटीला जलसमाधी मिळाली आहे. दरम्यान वाचवलेल्या खलाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि सुरक्षित आलेल्या मच्छिमारांना प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. बोट नेमकी कोणत्या कारणामुळे बुडाली हे अद्याप स्पष्ट झालेलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.