ETV Bharat / state

रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन जप्त, कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक

रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. तसेच कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच एका वेळी जवळपास 50 लाखाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीत 50 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, तिघांना अटक
author img

By

Published : Jul 21, 2019, 7:01 PM IST

रत्नागिरी - एमआयडीसी परिसरात 50 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱ्यांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरीत 50 लाखांचे अंमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

रत्नागिरी परिसरातल्या एमआयडीसी येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी परराज्यातून काही व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सापळा रचला. यावेळी तीनजण रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत एका पडक्या इमारतीमध्ये संशयास्पदरीत्या बोलताना आढळले. त्यानंतर पोलिसांनी या तिघांचीही चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेण्यात आली त्यावेळी तिघांकडे प्लास्टिक पिशवीमध्ये पांढरा रंग असलेला पावडरचा पदार्थ दिसून आली. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक सपोर्टींग युनिटकडून नार्कोटिक्स टेस्ट केली असता हा पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झाले.

पोलिसांनी जप्त केलेले हे कोकेन हरियाणातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दिनेश शुभे सिंह (वय 23, रा. हरियाणा), सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय 26 , रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुलिचंद मलीक (वय 51, रा. सोनपत हरियाणा ) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8(क),21(क),29 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या तिघांपैकी दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत. यातला एक सेलर आणि दुसरा वर्ग दोनचा कर्मचारी आहे.दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी ही माहिती दिली.

Intro:(Byte दोन आहेत, एक हिंदी आणि एक मराठी)

रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन जप्त

तिघांना अटक, तिघांपैकी दोघेजण कोस्टगार्डचे कर्मचारी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीत 50 लाखांचे अंमली पदार्थ (कोकेन) जप्त करण्यात आलं आहे. तसेच कोस्टगार्डच्या दोन कर्मचाऱयांसह तीघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. रविवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आलं आहे.
रत्नागिरी परिसरातल्या एमआयडीसी येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी परराज्यातूून काही इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमसह ग्रामीण पोलिसांचं एक पथक तयार करण्यात आलं.. त्यानंतर रत्नागिरी एमआयडीसी परिसरात सापळा रचला. यावेळी तीनजण रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेत एका पडक्या इमारतीमध्ये संशयास्पदरित्या बोलताना आढळले.. त्यानंतर पोलिसांनी या तिघांचीही चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेण्यात आली. यावेळी तिघांकडे प्लास्टिक पिशवीमध्ये पांढरा रंग असलेला पावडरचा पदार्थ दिसून आला. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक सपोर्टींग युनिटकडून नार्कोटिक्स टेस्ट केली असता हा पदार्थ कोकेन असल्याचं स्पष्ट झालं. हे 936 ग्रँमचं कोकेन पोलिसांनी जप्त केलं. हे कोकेन हरियाणातून आल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी दिनेश शुभे सिंह (वय 23, रा. हरियाणा), सुनील कुमार नरेन्द्र कुमार रनवा (वय 26 , रा. जिल्हा शिखर राजस्थान), रामचंद्र तुलिचंद मलीक (वय 51, रा. सोनपत हरियाणा ) या तिघांना ताब्यात घेण्यात आलं. रत्नागिरीत त्यांनी विक्रीसाठीच हे कोकेन आणले होते. हे प्राथमिक चौकशी दरम्यान उघड झाले आहे. या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 8(क),21(क),29 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे..
या तिघांपैकी दिनेश आणि रामचंद्र हे दोघे कोस्टगार्डचे कर्मचारी आहेत. यातला एक सेलर आणि दुसरा क्लास टू ऑफिसर आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाचवेळी जवळपास 50 लाख रु.चे कोकेन जप्त करण्यात आलं आहे.

Byte - डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक, रत्नागिरीBody:रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन जप्त

तिघांना अटक, तिघांपैकी दोघेजण कोस्टगार्डचे कर्मचारीConclusion:रत्नागिरीत 50 लाखांचे कोकेन जप्त

तिघांना अटक, तिघांपैकी दोघेजण कोस्टगार्डचे कर्मचारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.