ETV Bharat / state

शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, कोकणाच्या लाल मातीत उगवली स्ट्रॉबेरी; मिळवतोय चांगले उत्पन्न - Strawberry Farming News Ratnagiri

कोकणाच्या लाल मातीतही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होऊ शकते, हे देवरूखमधील शैलेश भस्मे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. फक्त शेतीवरच न थांबता भस्मे हे स्ट्रॉबेरीपासून इतर उत्पादनेही बनवतात.

Strawberry Farming News Ratnagiri
स्ट्रॉबेरी
author img

By

Published : Feb 18, 2021, 6:43 PM IST

रत्नागिरी - कोकणाच्या लाल मातीतही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होऊ शकते, हे देवरूखमधील शैलेश भस्मे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. फक्त शेतीवरच न थांबता भस्मे हे स्ट्रॉबेरीपासून इतर उत्पादनेही बनवतात. या उत्पादनांना चांगली मागणी आहे आणि यातून भस्मे यांना चांगली आर्थिक उलाढाल होत आहे.

माहिती देताना शेतकरी शैलेश भस्मे आणि मार्केटिंग व्यवस्थापक युयुत्सू आर्ते

हेही वाचा - राम मंदिरासाठी नरेंद्रचार्य महाराज संस्थानकडून 2 कोटी 53 लाख

शैलेश भस्मे यांचा स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग

कोकणात शेतीमध्ये अलीकडच्या काळात नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत, पारंपरिक भातशेतीबरोबरच इतरही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील शैलेश भस्मे हे असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी यावर्षी स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग राबविला. स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्या नजरेसमोर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण येते. या ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेती होते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी होऊ शकते, हे शैलेश भस्मे यांनी दाखवून दिले.

सुरुवातीला केले माती परीक्षण

स्ट्रॉबेरीची शेती करण्याचे ठरवल्यानंतर भस्मे यांनी सुरुवातीला माती परीक्षण केले. त्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी आवश्यक असणारे घटक मातीमध्ये असल्याचे समाजल्यानंतर त्यांनी दीड एकर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली. साधारणतः एक एकर जमिनीमध्ये जवळपास 20 हजार स्ट्रॉबेरीची झाडे लावण्यात आली. प्रत्येक झाडाला 700 ते 800 ग्राम स्ट्रॉबेरी उत्पन्न पकडले तरी 14 ते 15 टन उत्पन्न यातून मिळू शकते, असे शैलेश भस्मे सांगतात. सध्या ही स्ट्रॉबेरी 700 ते 400 रुपये किलो दराने विकली जात आहे.

दरम्यान, या स्ट्रॉबेरी प्लांटेशनसाठी शैलेश भस्मे यांना जवळपास 5 लाख रुपये खर्च आला आहे. आणि हा सर्व खर्च आतापर्यंत वसूलही झाला असल्याचे भस्मे सांगतात.

स्ट्रॉबेरीपासून बनवतात इतरही उत्पादने

अनेकवेळा भाव न मिळाल्याने कमी दरात स्ट्रॉबेरी विकली जाते. त्यामुळे, साहजिकच शेतकऱ्याचा तोटा होतो. पण, हे टाळण्यासाठी शैलेश भस्मे यांनी स्ट्रॉबेरीपासून सिरप, क्रश, पोळी, जेली, रेडी टू ड्रिंक सरबत, जाम आणि स्ट्रॉबेरी कॅन्डीसारखे बाय प्रोडक्ट तयार केले आहेत. हे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसह पर्यंटकांच्या देखील चांगलेच पसंतीला उतरत आहेत. त्यामुळे, यातून देखील चांगले पैसे मिळत असल्याचे भस्मे यांनी सांगितले.

वितरण व्यवस्था महत्वाची

ही स्ट्रॉबेरी शेती यशस्वी होण्यासाठी भस्मे यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांचे कष्ट या यशस्वी शेतीमधून दिसतात. पण, शेती केल्यानंतर केवळ उत्पादन घेऊन चालत नाही, तर त्याची वितरण व्यवस्था किंवा त्याचे मार्केटिंग देखील शेतकऱ्याने पाहावे, तरच शेतकऱ्याला चार पैसे चांगले मिळतात, असे या स्टॉबेरीची वितरण व्यवस्था पाहणारे युयुत्सू आर्ते यांनी सांगितले. शैलेश भस्मे यांनीही यासाठी मोठी मेहनत घेतली असल्याचे ते म्हणाले. कोकणाच्या लाल मातीत देखील स्ट्रॉबेरीमधून लाखोंची उलाढाल करून अशक्य ते शक्य करून दाखवत भस्मे यांनी शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा - निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडल्यामुळे आंबा हंगाम लांबवणीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.