रत्नागिरी - चिपळूनच्या लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. (Lote MIDC) (Explosion at Lote MIDC). येथील डिवाइन कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट झाला. (Explosion at chemical company). डिवाइन केमिकल कंपनीमध्ये फॅब्रिकेशनचे काम सुरू असताना केमिकलने पेट घेतल्याने हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामध्ये पाच कामगार भाजल्याची माहिती मिळते आहे. जखमी कामगारांना चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
![Explosion at Lote MIDC](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-loteblast-v1-mh10046_13112022140547_1311f_1668328547_866.jpg)
आधी देखील घडल्या आहेत घटना - याठिकाणी यापूर्वी देखील अशाप्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनांमध्ये सुद्धा अनेक कामगारांना जीव गमवावा लागला होता. कंपनी प्रशासनाकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व पोलीस या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झाले आहेत.