रत्नागिरी - राज्यातील महामार्ग पोलीस आता हायटेक झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ९६ इंटरसेप्टर कार महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही ही गाडी दाखल झाली आहे.
नव्याने दाखल झालेल्या इंटरसेप्टर कारमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होईल. महामार्गावरील वेगमर्यादा, हेल्मेट न वापरणे, सिटबेल्ट न बांधणे असे वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करणे आता सोपे होणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास सरळ गाडी मालकाच्या घरी दंडाचे चालान पोहोच केले जाईल.
हेही वाचा - रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; 13 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू
या कारच्या मदतीने तीन किलोमीटरपर्यंत वाहनाचा फोटो घेता येऊ शकतो. गाडीतील बारलाईट, सायरन, गाडीची काच किती ब्लॅक आहे याची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही देशातील एकमेव कार आहे. राज्यातील ९६ पैकी मुंबई-गोवा महामार्गावर चार गाड्या दाखल झाल्या आहेत.