रत्नागिरी - रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणाला पेव फुटले आहे. रत्नागिरीतील महामार्गाजवळ साळवीस्टॉप ते कुवारबाव भागात रत्याच्या बाजूला एका रांगेत अनेक अनधिृत बांधकामे उभारण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकामासह फेरीवाले तसेच टपऱ्यांनी हा परिसर व्यापला आहे. या अनधिृत उभारण्यात आलेल्या बांधकामांंविरोधात कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कोल्हापूरमधील राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यालयाने या अनधिकृत बांधकामांची दखल घेतली आहे. त्यासाठी पहिली पायरी म्हणून बांधकामे हटवण्यासाठी शंभर जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या चार दिवसात बांधकामे, खोके, टपऱ्या हटवावीत, असे आदेश या नोटीशीद्वारे देण्यात आले आहेत.
महामार्गाशेजारी अनधिकृत बांधकामे
साळवीस्टॉप ते कुवारबाव या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा खोके, टपऱ्यासह दुकानांसाठी पक्की बांधकामे केली जात आहेत. टीआरपी ते कुवारबाव चौक येथे रस्त्याच्या बाजुला असलेल्या सरकारी जागेत अनधिकृत दुकान गाळ्यांसाठी बांधकाम सुरू केले आहे. एकाच रेषेत सरसकट गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे.
बांधकामे हटविण्याची नोटीस
राष्ट्रीय महामार्ग जमीन व रहदारी अनियम 2002 (2003 चे 13) च्या कलम 26 मधील पोटकलम 6 अन्वये त्या फेरीवाल्यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत बांधकाम, खोके, टपऱ्या काढून टाकण्याचे आदेश प्रकल्प संचालकांनी दिले आहेत. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला अनधिकृत बांधकामाबाबत लेखी पत्र दिल्यानंतर प्राधिकरणाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा - मंदिरे उघडल्यानंतर गणपतीपुळ्यात दर्शनासाठी भाविकांची धाव
हेही वाचा - कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर चमकणाऱ्या लाटा!