ETV Bharat / state

रत्नागिरीतील या 'स्पेशल' विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक राख्यांचा 'अविष्कार'

रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतील गतिमंद मुलांनी विशेष राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. कारण या राख्या पर्यावरण पूरक आहेत.

राखी तयार करताना विद्यार्थी
author img

By

Published : Aug 14, 2019, 2:16 PM IST

Updated : Aug 14, 2019, 4:49 PM IST

रत्नागिरी - बहिण-भावातील नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. पण, रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतील गतिमंद मुलांनी विशेष राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. कारण या राख्या पर्यावरण पूरक आहेत.

रत्नागिरीतील 'स्पेशल' विद्यार्थ्यांकडून स्पेशल राख्यांचा 'अविष्कार'

अविष्कारमधील १७ विद्यार्थी या राख्या तयार करत आहेत. ४० टक्के कागदाचा लगदा, ६० टक्के शाडूच्या मातीपासून बनविलेल्या या राख्यांमध्ये फुले, काकडी, पडवळ, मिरची अशी विविध बिया टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे याला प्लँटेबल सीड, असे नाव देण्यात आले आहे. रक्षाबंधनानंतर ही राखी कुठे पडली किंवा कुंडीत विसर्जीत केली की यापासून रोपे तयार होऊ शकतात.

या मुलांनी जवळपास साहेतीन हजार राख्या तयार केल्या आहेत. ही आगळी वेगळी पर्यावरणपूरक संकल्पना ऐकून अनेक बहिणी सध्या या राख्या खरेदी करण्यासाठी अविष्कार शाळेत गर्दी करत आहेत. या राख्यांचे वजन पाच ग्रॅमपासून ते अकरा ग्रॅम एवढेच आहे. विविध रंगात आणि आकर्षक सजावट केलेल्या या राख्यांना मोठी मागणी आहे. एकीकडे भाऊ आणि बहिणीचे नाते जपताना निसर्गासोबतही आपले नाते जपले जाणार आहे.
आपले पारंपारिक सण साजरे करतानच पर्यावरणाशी आपले नाते जपत त्याचीही काळजी करणारे हे काम कौतुकास्पदच म्हणावे लागेल.

Intro: 'आविष्कार'मधील विद्यार्थ्यांचा राखीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश

रत्नागिरी, प्रतिनिधी

भाऊ आणि बहिणीच्या प्रवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण अवघ्या काही तासांवर आलेला आहे. त्यामुळे बाजारपेठांंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या पहायला मिळत आहेत. पण रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतल्या गतिमंद मुलांनी तयार केलेल्या पर्यावरण पुरक राख्यांची चर्चा सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. कागदाचा लगदा आणि शाडू मातीपासून तयार केलेली ही राखी सुरेख आहेच, त्याशिवाय या राखीमध्ये आहे वेगवेगळ्या झाडांचं बी.. म्हणजेच राखी विरघळली की जिथे असेल तिथे रोप तयार होऊ शकते, पाहूया या राख्यांवरचा स्पेशल रिपोर्ट...

व्हिओ-1- रक्षाबंधन...भाऊ आणि बहिण यांच्यातील नातं जपणारा पवित्र सण....रक्षा बंधनाला भाऊरायाच्या हातात बांधण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या राख्या येतात. पण आज आम्ही तुम्हाला एक आगळी वेगळी राखी दाखवणार आहोत. रत्नागिरीतल्या अविष्कार शाळेतील हि गतिमंद मुलं...पण सध्या हिच मुलं राखी बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. हि मुलं हि राखी बनवतायत ती पर्यावरण पुरक आहेत. ४० टक्के कागदी लगदा आणि ६० टक्के शाडूची माती मिळून हि पर्यावरण पुरक राखी बनवली गेलीय. या मिश्रणापासून गोळे केले जातात. त्याला राखीचा आकार दिला जातो.. आणि त्यावर सुरेख रंगकाम करून हि पर्यावरण पुरक राखी हि मुलं तयार करतायत.

बाईट-1- सचिन वायंगणकर. व्यवस्थापकीय अधिक्षक अविष्कार शाळा

व्हिओ-2- या राखीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे या राखीचा उपयोग या मुलांनी प्लॅटेबल सीड म्हणुन केला आहे. रक्षाबंधन झालं कि राख्यांचे विसर्जन केलं जाते. मात्र या विसर्जन होणाऱ्या राखीतून चक्क एक छोटं रोपटं उगवून येवू शकतं. होय माती आणि कागद्याच्या लगद्यापासून राखी तयार होत असताना त्याला आकार देताना यात मुलांनी विविध प्रकारच्या झाडांच्या बीया यात टाकल्यात. जेणेकरून हि राखी कुठे पडेल किंवा कुंडीत टाकली तर त्यापासून एखादे रोपटे उगवणार आहे. राखीमागची पर्यावरण पुरक भनाट कल्पना इथल्या या मुलांनी सुद्दा आनंद देवून जातेय.
बाईट-2- प्रथमेश घवाळी. अविष्कार मधील विद्यार्थी..
सुमैय्या पटेल - विद्यार्थिनी

व्हिओ-3- झेंडूचं बी,विविध छोट्या फुल झाडांंचं बी, टाॅमोटो, काकडी, पडवळ किंवा अगदी मिरचीच्या बीया या राख्यांमध्ये वापरण्यात आल्या आहेत.
त्यामुळे हि संकल्पना ऐकून अनेक बहिणी सध्या या राख्या खरेदी करण्यासाठी अविष्कार शाळेत येतायत. जवळपास साडेतीन हजार राख्या या मुलांनी तयार केल्यात.

बाईट-3- रश्मी कलंगुटकर. राखी खरेदी करणारी महिला

व्हिओ-4- या पर्यावरण पुरक राख्यांचे वजन पाच ग्रॅमपासून ते अकरा ग्रॅम एवढेच आहे. विविध रंगात आणि आकर्षक सजावट केलेल्या या राख्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या सणात राखीचं आपरूप अनेकांना असते. एकीकडे भाऊ आणि बहिणीचे नाते जपताना या अनोख्या राख्यांच्या माध्यमातून पर्यावरण पुरक रक्षाबंधन साजरे करण्याची मज्जा काही वेगळीच असणार...

End p2cBody: 'आविष्कार'मधील विद्यार्थ्यांचा राखीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेशConclusion: 'आविष्कार'मधील विद्यार्थ्यांचा राखीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश
Last Updated : Aug 14, 2019, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.