रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयाल, रत्नागिरी येथील जिल्हा शल्यचिकीत्सक पद गेल्या महिनाभरापासून रिक्त होते. त्या पदावर नव्याने डॉ. अशोक बोलदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोलदे यांनी शनिवारी कार्यभार हाती घेतला आहे.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. देवकर यांच्या निलंबनानंतर येथील पद रिक्त राहिले होते. लाच प्रकरणामुळे डॉ. देवकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता. डॉ. फुले रजेवर गेल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. संभाजी गरुड यांच्याकडे तात्पुरता प्रभारी कार्यभार सोपवण्याचा निर्णय झाला. तोपर्यंत डॉ. विटेकर हे येथील कारभाराची सूत्रे हाताळत होते. मात्र, आता त्या पदावर डॉ. अशोक बोलदे यांची नियुक्ती झाली आहे