रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची निवडणूक राणे विरुद्ध सेना वादामुळे चर्चेत राहिली. सिंधुदुर्गात राणे आणि केसरकर यांच्यात दहशतवादावरून आरोप प्रत्यरोपांचा सामना रंगला. दरम्यान आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसह सावंतवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणूकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण हा राणे यांचा कोकणातील करिश्मा अद्याप आहे की नाही याचाच निर्णय या निवडणूकीत होणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात ५७.६३ टक्के मतदान पार पडलंय. मतदारांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळाला. आपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपल्या भिरवंडे या गावी मतदान केले.