ETV Bharat / state

रत्नागिरीत सद्यस्थिती 1418 आयसोलेशन बेड, तर 271 ऑक्सिजन बेड उपलब्ध - रत्नागिरी कोरोना

जिल्ह्यात एकूण बेडची संख्या 3757 आहे. यामध्ये आयसोलेशन बेड (विना ऑक्सिजन) 2893, तर ऑक्सिजन बेड 647, तसेच व्हेंटिलेटर बेडची (ICU) संख्या 217 आहे. दरम्यान सद्यस्थितीत आयसोलेशन बेड (नॉन ऑक्सिजन बेड) 1418 एवढे उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेड 271 उपलब्ध आहेत, शिवाय व्हेंटिलेटर बेडची संख्या 78 आहेत.

रत्नागिरी जिल्हा रुग्णायल
रत्नागिरी जिल्हा रुग्णायल
author img

By

Published : May 26, 2021, 5:12 PM IST

रत्नागिरी - राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर १८ जिल्ह्यांतील गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. गृह विलगीकरण ऐवजी जिल्ह्यात कोरोना केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे. गृह विलगीकरण असणाऱ्या रूग्णांमुळे संसर्ग वाढत असून ते रोखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा देखील या 18 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

कोरोना रुग्णांची सद्यस्थिती

शासन अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 33554 एवढी रुग्णसंख्या होती. यातील 29039 एवढे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण 3402 एवढे आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात 1113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा डेथ रेट हा 3.31 एवढा आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 17.43 इतका आहे.

होम आयसोलेशनची सद्यस्थिती

जिल्ह्यात सद्यस्थितीपर्यंत 1 हजार 456 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या होम आयसोलेशन असणााऱ्यांवर ग्रामकृती दल लक्ष ठेवून असणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बेडची संख्या

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या 37 कोविड केअर सेंटर आहेत. तर 5 डेडिकेटेड कोविड रुग्णालय आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय सेंटर 21 आहेत. तर 3 ग्रामीण रुग्णालय अशी एकूण 66 कोरोना रुग्णालय कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बेडची संख्या 3757 आहे. यामध्ये आयसोलेशन बेड (विना ऑक्सिजन) 2893, तर ऑक्सिजन बेड 647, तसेच व्हेंटिलेटर बेडची (ICU) संख्या 217 आहे. दरम्यान सद्यस्थितीत आयसोलेशन बेड (नॉन ऑक्सिजन बेड) 1418 एवढे उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेड 271 उपलब्ध आहेत, शिवाय व्हेंटिलेटर बेडची संख्या 78 आहेत.

हेही वाचा- अंगावरील कपडे काढताच रुग्णालयाने परत केले पैसे; नाशिकातील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.