ETV Bharat / state

Ganapatipule गणपतीपुळेत भाविकांची गर्दी! आज थेट गाभाऱ्यात जावून दर्शन घेता येणार - आज थेट गाभाऱ्यात जावून दर्शन घेता येणार

कोकणातल्या गणेशोत्सवाला आज सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थश्रेत्र असलेल्या गणपती पुळ्यातही श्रींच्या दर्शनासाठी आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आणि फक्त याच दिवशी म्हणजे घराघरात प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या दिवशीच गणपतीपुळ्याच्या स्वयंभू गणरायाला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. थेट गाभाऱ्यात जावून आपल्या लाडक्या गणरायाला हात लावून त्याला भेटण्याची संधी मिळते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 31, 2022, 7:13 PM IST

रत्नागिरी - कोकणातल्या गणेशोत्सवाला आज सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थश्रेत्र असलेल्या गणपती पुळ्यातही श्रींच्या दर्शनासाठी आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आणि फक्त याच दिवशी म्हणजे घराघरात प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या दिवशीच गणपतीपुळ्याच्या स्वयंभू गणरायाला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. थेट गाभाऱ्यात जावून आपल्या लाडक्या गणरायाला हात लावून त्याला भेटण्याची संधी मिळते.

गणपतीपुळेत भाविकांची गर्दी!

अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू - गणपतीपुळे पंचक्रोषित मूळचे स्थानिक कोणीही घरी गणपणी मूर्ती आणत नाहीत. आज एकमेव दिवस आहे की गणपतीपुळे पंचक्रोषीत गवातील प्रत्येक भक्तगण येवून देवळात गणपतीचे दर्शन घेतो तेही गणपतीच्या गाभाऱ्यात जावून वर्षातील हा एकच दिवस असा आहे, ज्या दिवशी थेट गाभाऱ्यात जाऊन श्रीचे स्पर्श दर्शन घेता येते. त्यामुळे पहाटेपासून या ठिकाणी गावकऱ्यांनी तसेच बाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. त्यामुळे वर्षातून केवळ एक वेळा येणाऱ्या या संधीचे सोने करण्यासाठी रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात गणेशभक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. शेकडो वर्षांपासून भाद्रपद चतुर्थीला ही परंपरा सुरु आहे. आज सकाळपासून हजारो भक्तांनी थेट गाभाऱ्यात जात गणरायाचे आर्शिवाद घेतले.

हेही वाचा - पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.