ETV Bharat / state

हाथरस घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन - congress satyagraha andolan

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, काँग्रेसकडून देशभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले

congress satyagraha andolan in ratnagiri
उत्तर प्रदेशमधील घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरी काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
author img

By

Published : Oct 5, 2020, 4:56 PM IST

रत्नागिरी- उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच या घटनेतील पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील घटनेच्या निषेधार्थ व पीडितेच्या न्यायासाठी काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ‌अ‌ॅड.‌‌‌‌ विजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अशोकराव जाधव, दीपक राऊत, रुपाली सावंत, कपिल नागवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, काँग्रेसकडून देशभर या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहेत. तसेच पीडितेच्या कुटुंबांची भेट घ्यायला निघालेल्या खासदार राहुल गांधी व अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करत त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, या घटनेचाही निषेध करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.