ETV Bharat / state

'नाणार'बाबत मुख्यमंत्र्यांचे मौन; प्रकल्प विरोधकांचीही भेट नाकारली - nanar project

मुख्यमंत्र्यांनी आज गणपतीपुळे येथे जाहीर सभा घेतली, मात्र, या सभेत नाणारबाबत त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही.

nanar project
'नाणार'बाबत मुख्यमंत्र्यांचे मौन; प्रकल्प विरोधकांचीही भेट नाही
author img

By

Published : Feb 17, 2020, 7:43 PM IST

रत्नागिरी - कोकणात नाणारचा मुद्दा गाजत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी गणपतीपुळे येथे जाहीर सभा घेतली, मात्र, या सभेत नाणारबाबत मुख्यमंत्र्यांनी एका शब्दाचाही उल्लेख केला नाही. तसेच नाणारमधून काही विरोधकदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झाली नाही.

ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

मुख्यमंत्र्यांनी 'सामना'त आलेल्या जाहिरातीबाबत खुलासा करावा, अशी त्यांची मागणी होती. तसेच जे शिवसेनेचे पदाधिकारी या प्रकल्पाचे समर्थन करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या ग्रामस्थांची आहे. दरम्यान, भेट झाली नसली तरी आपले निवेदन त्यांच्यापर्यंत पोहचवणार असल्याची प्रतिक्रिया या ग्रामस्थांनी दिली.

हेही वाचा -

कराडमध्ये दोन गटात तुफान राडा; दुचाकी जाळली, अग्निशमन दलाच्या गाडीवरही दगडफेक

अस्थी विसर्जन करून परतणाऱ्या 8 जणांवर काळाचा घाला; 4 गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.