ETV Bharat / state

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर - एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्ह्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत आहेत. (Eknath Shinde Ratnagiri daura). मात्र मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी स्पष्ट केलं आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 15, 2022, 10:42 PM IST

आमदार राजन साळवी

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. (Eknath Shinde Ratnagiri daura). यावेळी त्यांच्या हस्ते साडेसातशे कोटी रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे. याचबरोबर बहुचर्चित तारांगणचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

निमंत्रण पत्रिका
निमंत्रण पत्रिका

ठाकरे गट उपस्थित राहणार नाही : दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलं आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी यांचीही नावं आहेत. याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले, "प्रोटोकॉल म्हणून आमचं नाव टाकलं असेल किंवा आम्हाला निमंत्रित केलं असेल, पण त्यांचा तो पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जी कामं मंजूर झाली, त्यांची आता उद्घाटनं होत आहेत. उद्याच्या कार्यक्रमाला जाणं हे आम्हाला बंधनकारक नाही. त्यामुळे उद्या आम्ही जाणार नाही, ही आमची भूमिका असल्याचं आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.