रत्नागिरी/ राजापूर : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. वारिसे यांच्या हत्येतील संशयीत आरोपी पंढरीनाथ आंबेकर यांची एक ऑडिओ क्लीप राजापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. यातून अजून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी आंबेकर याला यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे वारिसे हत्या प्रकरण : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पत्रकार म्हणून शशिकांत वारिसे काम करत होते. त्यांना धडाडीचे पत्रकार आणि अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार म्हटले जात होते. वारिसे हे रिफायनरी विरोधात लिखाण करत होते. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बॅनवर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो यावर त्यांनी शेवटची बातमी प्रसारित केली होती. ही बातमी ज्या प्रसारित झाली होती त्याच रात्री वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान वारिसे यांनी जी बातमी केली होती ती पंढरीनाथ आंबेकर यांच्याविषयीची होती. वारिसे यांच्या हत्येप्रकरणी आंबेकर यांना कणकवली येथून पोलिसांनी अटक केली होती. वारिसे यांची हत्या झाली त्यादिवशी शशिकांत वारिसे हे कामानिमित्त राजापूरला आपल्या दुचाकीने गेले होते. तेव्हा तेथील एका पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून वेगाने आलेल्या थार गाडीने धडक दिली. ही थार गाडी पंढरीनाथ आंबेकर यांची होती. धडक दिल्यानंतर वारिसे हे जखमी झाले होते. जखमी वारिसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा : या प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेकर याला अटक केली आहे. त्यांच्यावर खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. वारिसे यांचा अपघात हा ठरवून करण्यात आला होता, याविषयीची कबुली सरकारकडूनही देण्यात आली आहे. दरम्यान या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. पोलिसांना आंबेकर यांची कॉल रेकॉर्डिंग मिळाली आहे. यात ते कोणाशी तरी बोलत आहेत. 'एकाच काम तमाम करायचे आहे' असे ते एकाला सांगत आहेत. दरम्यान ते कोणाशी हा संवाद साधत आहेत. त्याचा पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा -