ETV Bharat / state

'त्या' जहाजाला प्रादेशिक बंदर विभागाकडून अल्टीमेटम

author img

By

Published : Jul 22, 2020, 12:55 PM IST

निसर्ग चक्रीवादळात भरकटून मिऱ्या किनाऱ्याला लागलेले जहाज आजपर्यंत त्याच ठिकाणी आहे. ते जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून कोणतीच हालचाली होत नसल्याने प्रादेशिक बंदर विभागाने जहाज काढण्यासाठी एजन्सीला नोटीस दिली आहे.

Ship
Ship

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळात भरकटून मिर्‍या किनार्‍याला लागलेले बसरा स्टार एजन्सीचे इंधनवाहू जहाज किनार्‍यावर पुरते बसले आहे. उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्यांना चार दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यांनी जहाज भंगारात काढणे किंवा दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटून मिर्‍या किनार्‍यावर लागले आहे. दीड महिना झाले तरी जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित गती दिसत नाही. त्यात भरतीमुळे उठणार्‍या अजस्र लाटांचा मारा जहाज सोसत आहे. त्यामध्ये जहाज दयनीय अवस्था झाली आहे. जहाजामध्ये पाणी भरून केबिन असलेला भाग किनार्‍यावर रुतला आहे. त्यामुळे जहाज हेलकावे खावून बंधार्‍याला आदळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

या जहाजामध्ये असलेल जळके ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल गळतीचा किनार्‍याला धोका होता. मात्र, भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी, जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींनी चार से सहा दिवसाची मोहिम आखून जहाज इंधनमुक्त केले आहे.

प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला यापूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानुसार किनारा सुरक्षेबाबत तत्काळ पावले उचलण्यात आली. जहाज इंधनमुक्त झाल्यानंतर आता दुसरी नोटिस बंदर विभागाने एजन्सीला दिली आहे. त्यासाठी चार दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात जहाज भंगारात काढा किवा किनार्‍यावर दुरूस्त करून ओढून नेण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी नोटीस बजावल्याचे बंदर विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.